धोकादायक इमारतींसाठी २४ तास नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:17 AM2018-06-08T01:17:49+5:302018-06-08T01:17:49+5:30

जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेकरीता म्हाडाने २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

 24 hours control room for dangerous buildings | धोकादायक इमारतींसाठी २४ तास नियंत्रण कक्ष

धोकादायक इमारतींसाठी २४ तास नियंत्रण कक्ष

Next

मुंबई : जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेकरीता म्हाडाने २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
मुंबईत म्हाडाच्या अखत्यारीत १४,२८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. इमारतीच्या धोक्याची लक्षणे किंवा इमारत कोसळल्याचे म्हाडाच्या निदर्शनास आणून देण्याकरता आणि म्हाडातर्फे त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याकरता ताडदेवमधील इमारत क्रमांक ८९-९५ रजनीमहलमध्ये म्हाडाकडून २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात उपअभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी २४ तास हजर असणार आहेत. धोक्याची कोणतीही सूचना मिळाल्यास हे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करतील. तसेच महानगरपालिका नियंत्रण कक्षातर्फे प्राप्त झालेली माहिती त्वरीत म्हाडाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन पुढील आवश्यक ती कारवाई ही करतील.
यासाठी या इमारतीतील रहिवाशांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. इमारतीच्या अतिधोकादायक भागाचा वापर त्वरीत थांबवावा. इमारतीला टेकू लावणे ,इमारतीची दुरूस्ती करणे अशी कामे म्हाडाच्या अधिकाºयांना विश्वासात घेऊन करावी. इमारतींना तडे जाणे,माती पडू लागणे, भेगा रूंद होणे,इमारतीचा कोणताही भाग खचणे,जमिनीपासून भिंत अलग होणे अश्या कोणत्याही शक्यता वाटल्यास म्हाडाच्या या नियंत्रण कक्षास त्वरीत संपर्क साधावा.
म्हाडाच्या या नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्यासाठी २३५३६९४५/२३५१७४२३ किंवा ९१६७६५५२११२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना म्हाडातर्फे करण्यात आले आहेत.

Web Title:  24 hours control room for dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई