सिनेट निवडणुकीतून १८ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:22 AM2018-03-13T02:22:32+5:302018-03-13T02:22:32+5:30

मुंबई विद्यापीठ सिनेटच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे

18 Senate withdrawal from Senate elections | सिनेट निवडणुकीतून १८ जणांची माघार

सिनेट निवडणुकीतून १८ जणांची माघार

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठ सिनेटच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे, तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे.
माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे समजते. खुल्या गटातून ब्रिजेश दुबे, विद्याधर जांभोरीकर, सुनिल कुंठे, चंद्रकांत कोबनक, सुशिल साळवे, सचिन शिर्के , अजय तापकीर, दिपीका आग्रे यांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. महिला प्रवर्गातून दिपिका आग्रे, अनुसुचित जाती एससी प्रवगार्तून विद्या हंकारे, सुनिल कंठे, तर एसटी प्रवर्गातील तुषार कुमारे, ओबीसीतून मनोज टेकाडे यांचा अर्ज बाद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खुल्या गटातून माजी सिनेट सदस्य संजय वैराळ, अश्विनी पवार, शैलेश देशपांडे, सूचित सावंत;
तर अनुसूचित जाती गटातून
विद्याधर जांभोरीकर, ओबीसीमधून डॉ. सचिन मांडलिक यांनी अर्ज भरला आहे.

Web Title: 18 Senate withdrawal from Senate elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.