नीरव मोदी याच्याशी संबंधित १५0 शेल कंपन्या सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:42 PM2018-02-17T23:42:31+5:302018-02-17T23:42:44+5:30

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) महाघोटाळ्याचा मास्टर माइंड नीरव मोदी, त्याचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्याशी संबंध असलेल्या १५0 शेल कंपन्या सापडल्या आहेत.

150 shell companies related to Neerav Modi were found | नीरव मोदी याच्याशी संबंधित १५0 शेल कंपन्या सापडल्या

नीरव मोदी याच्याशी संबंधित १५0 शेल कंपन्या सापडल्या

Next

नवी दिल्ली/मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) महाघोटाळ्याचा मास्टर माइंड नीरव मोदी, त्याचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्याशी संबंध असलेल्या १५0 शेल कंपन्या सापडल्या आहेत.
अधिकाºयाने सांगितले की, कंपनी व्यवहार मंत्रालयाने या कंपन्या हुडकून काढल्या असून त्यांचा तपास केला जाणार आहे. काळा पैसा प्रवाहित करण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर होतो. त्या नाममात्र व्यावसायिक उलाढाल करतात. या घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडी यांसह विविध तपास संस्थांकडून केला जात आहे. सेबी आणि स्टॉक एक्सचेंजकडूनही या कंपन्यांवर नजर ठेवली जात आहे.
३ कंपन्यांचे पत्ते चुकीचे
पीएनबीकडून कर्ज घेताना नीरव मोदीने दिलेले आपल्या तीन बँकांचे पत्ते चुकीचे असल्याचे समोर आले आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर सीबीआयने पहिल्यांदा या कंपन्यांच्या पत्त्यावर धाडी टाकल्या. तथापि, त्यातून फारसे काही हाती लागले नाही. सोलर एक्सपोर्टस् आणि स्टेलर डायमंडस् या कंपन्यांची कार्यालये मुंबईतील आॅपेरा हाऊस येथील पत्त्यावर असल्याचे पीएनबीच्या दस्तावेजात नोंदविण्यात आले आहे. तिथे शोध घेतला असता कंपन्या फार पूर्वीच लोअर परेल येथीलच कमला मिलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती मिळाली. नगीनदास मॅन्शनमध्ये केवळ दोन लोक काम करतात. तिसरी कंपनी डायमंड आर यूएस हिचे कार्यालय आॅपेरा हाऊसजवळील प्रसाद चेंबर्समध्ये असल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र तेथे नीरव मोदीच्या मालकीच्या धर्मादाय संस्थेचे काम चालते. तेथील कर्मचाºयांनी कामाची फारशी माहिती पत्रकारांना दिली नाही.

सहा महिन्यांत संकटातून बाहेर : पीएनबी
नीरव मोदीच्या घोटाळ्यात पीएनबीला ११,४00 कोटींचा फटका बसला असला तरी या संकटातून बँक सहा महिन्यांत बाहेर येईल, असा विश्वास पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही सहा महिन्यांत संकटातून बाहेर येऊ. बँकेचा आकार आणि क्षमता समस्येतून बाहेर पडण्यायोग्य आहे. बँकेला समस्या आहेत. तथापि, आम्ही त्या सोडवू. गुन्ह्यात अडकलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. बँकेतील नियंत्रण आणि व्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेत आहोत.

Web Title: 150 shell companies related to Neerav Modi were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.