मुंबईत रुग्णालय प्रयोगशाळेत १३० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:59 PM2018-09-19T23:59:56+5:302018-09-20T00:01:34+5:30

पालिकेच्या प्रयोगशाळेतील एकूण ४५१ पदांपैकी तब्बल १३० पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीतून चव्हाट्यावर आली आहे.

130 vacancies in the hospital laboratory in Mumbai are vacant | मुंबईत रुग्णालय प्रयोगशाळेत १३० पदे रिक्त

मुंबईत रुग्णालय प्रयोगशाळेत १३० पदे रिक्त

googlenewsNext

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना उपचार मोफत मिळतात. मात्र रोगाचे निदान करण्यास प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता ही महत्त्वाची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. त्याचा फटका सामान्य रुग्णांना बसत असून विविध चाचणींसाठी त्यांना खासगी लॅबमधून तपासणी करून घ्यावी लागत आहे.
पालिकेच्या प्रयोगशाळेतील एकूण ४५१ पदांपैकी तब्बल १३० पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीतून चव्हाट्यावर आली आहे. आरोग्य विभागाकडून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्याबाबत माहिती मिळविली आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत असताना गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांचा आधार असतो. मात्र उपचार होण्यापूर्वी विविध चाचणी व रोग निदानासाठी प्रयोगशाळेची आवश्यकता असते. यापैकी बºयाच चाचण्यांचे शुल्क खासगी प्रयोगशाळांमध्ये दुप्पट आहे. सर्वसामान्य गरजू रुग्णांना या चाचण्यांचे शुल्क भरणे शक्य होत नाही. अशावेळी पालिकेच्या प्रयोगशाळा दिलासादायी ठरू शकल्या असत्या. मात्र प्रयोगशांतील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांच्या खिशाला कात्री बसत आहे.

Web Title: 130 vacancies in the hospital laboratory in Mumbai are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.