कोठडीतून ११८ आरोपी पसार; २०१६ मध्ये पोलीस कोठडीतील मृत्यूच्या १२ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:08 AM2017-12-03T02:08:45+5:302017-12-03T02:08:55+5:30

पोलिसांच्या हातावर तुरी देत, महाराष्ट्रातून ११८ कैदी पळाल्याची खळबळजनक माहिती एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. यामध्ये कोठडीतून आरोपी पळण्याचे प्रमाणही गंभीर आहे. त्यामुळे कैद्यांना पोलिसांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

118 accused escaped from custody; Twelve incidents of death in police custody in 2016 | कोठडीतून ११८ आरोपी पसार; २०१६ मध्ये पोलीस कोठडीतील मृत्यूच्या १२ घटना

कोठडीतून ११८ आरोपी पसार; २०१६ मध्ये पोलीस कोठडीतील मृत्यूच्या १२ घटना

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : पोलिसांच्या हातावर तुरी देत, महाराष्ट्रातून ११८ कैदी पळाल्याची खळबळजनक माहिती एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. यामध्ये कोठडीतून आरोपी पळण्याचे प्रमाणही गंभीर आहे. त्यामुळे कैद्यांना पोलिसांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. याबरोबरच पोलीस कोठडीतील मृत्यूमध्ये राज्याची आघाडी असणे चिंतेची बाब ठरत आहेत. त्यातच पोलीस कोठडीतील सर्वाधिक मृत्यू महाराष्टÑात झाले आहेत.
भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्ये, सांगलीतील अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर खाकीतील थर्ड डिग्री चर्चेत आली. नॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोच्या अर्थात, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटना घडल्या़ त्यात महाराष्ट्रात १२ घटना घडल्या होत्या़ त्या खालोखाल गुजरातमध्ये ९ घटना घडल्या होत्या़ त्या पाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये पोलीस कोठडीत ५ मृत्यू झाले होते़
कुठेतरी हरवत चाललेला पोलिसांचा धाक, वरिष्ठांचा दबाब, गुन्ह्यांचा उलगडा करण्याचा खटाटोप, बक्षिसासाठी धडपडीत आरोपींवर आजही थर्ड डिग्रीचा वापर होत असल्याचे या घटनांमुळे समोर आले आहे. अनेकदा दडपणाखाली हे कैदी कोठडीतच आत्महत्या करत असल्याचे वास्तवही या आकडेवारीतून स्पष्ट होते. अशात या प्रकरणानंतर आरोपी, कैदी यांच्यासोबत कसे वागायचे, याबाबतची कार्यशाळा घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. आरोपींचा छळ होत असल्याच्या तक्रारी निनावी पत्रांद्वारेही केल्या जातात. या तक्रारींची वेळीच दखल घेऊन संबंधित अधिकाºयांची चौकशी करा, असेही आदेशात म्हटले आहे.
दुसरीकडे शिक्षेच्या भीतीने आरोपीच पसार होत असल्याचे वास्तवही एनसीआरबीच्या अहवालातून समोर आले. देशभरातून १,३२० कैदी पोलिसांच्या तावडीतून निसटले. या प्रकरणी १ हजार १४३ गुन्हे दाखल आहेत. यात कोठडीतून १६८ कैदी पळाले आहेत. अनेकदा पोलीस कारवाईच्या भीतीने, तर कधी पोलिसांनाच हाताशी धरून, आरोपी पसार होत असल्याचे चित्र आहे.

वर्षभरात ३८८ पोलिसांना बेड्या
वर्षभरात पोलिसांविरुद्ध ४८७ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात ३८८ पोलिसांना अटक करण्यात आली. १९६ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत २० पोलिसांना दोषी ठरविण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यूंच्या १२ घटनांपैकी ८ घटनांमध्ये आरोपींनी पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे़ या घटनांपैकी ३ गुन्ह्यांत पोलिसांचा सहभाग समोर आला आहे. यापैकी १२ गुन्ह्यांत दंडाधिकाºयांकडून चौकशी सुरू आहे.

उत्तर प्रदेशात कोठडीतून पळालेल्या ३४ आरोपींपैकी २७ आरोपींना पकडण्यात तर मध्य प्रदेशात कोठडीतून पळालेल्या २६ पैकी १४ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

वर्षभरात पळालेले आरोपी
राज्य गुन्हे पळालेले कोठडीतून कोठडी-
आरोपी पळालेले बाहेरून
उत्तर प्रदेश २८२ ३२७ ३४ २९३-२३५
मध्य प्रदेश १११ १३३ २६ १०७-८१
महाराष्ट्र ९८ ११८ २१ ९७-७३

Web Title: 118 accused escaped from custody; Twelve incidents of death in police custody in 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग