नसबंदी करणाऱ्या पुरुषांना ११००, तर महिलांना ६०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:41 AM2019-01-19T05:41:48+5:302019-01-19T05:41:52+5:30

मुंबई महापालिकेचा स्त्री-पुरुष समानतेत भेदभाव : दोघांनाही समान रक्कम देण्याची वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

1100 for sterilizing men and 600 rupees for women | नसबंदी करणाऱ्या पुरुषांना ११००, तर महिलांना ६०० रुपये

नसबंदी करणाऱ्या पुरुषांना ११००, तर महिलांना ६०० रुपये

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर


मुंबई : आज देशासह मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे १ कोटी ६० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून नसबंदी करणाºया पुरुष व महिलांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मोबदला महापालिका देत आहे. मात्र मुंबई महापालिका स्त्री-पुरुष समानतेत भेदभाव करत असून नसबंदी करणाºया पुरुषांना ११०० तर नसबंदी करणाºया महिलांना ६०० रुपये इतकी रक्कम महापालिका देत आहे.


एकीकडे देश प्रगतीकडे वाटचाल करत असताना आणि आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना मुंबई महानगरपालिका असा भेदभाव का करते, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केला आहे.

लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा पालिकेचा स्तुत्य उपक्रम असला तरी त्यांनी स्त्री व पुरुष समानतेचा पुकार करत नसबंदी करणाºया पुरुषांना व स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून समान रक्कम द्यावी. तसेच जास्तीत जास्त स्त्री व पुरुष या योजनेचा लाभ घेण्यासाठी रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांना ई-मेल पाठवताच, त्यांनी याची दखल घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

च्पालिकेचा उपक्रम स्तुत्य असला तरी समानतेला तडा देण्यात आल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनने केला.
च्समान रक्कम देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: 1100 for sterilizing men and 600 rupees for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.