Youth Movie Trailer Launch | युथ चित्रपटाच ट्रेलर लॉन्च

तरूण हे देशाचे भविष्य असतात अशी वाक्य नेहमीच आपण ऐकत असतो. कारण तरूणांमध्ये बदल घडवायची ताकद असते.. आणि हेच आगामी 'युथ' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतेच याचित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले आहे.आजकालच्या जगात तरूणपिढी समाजात किती बदल घडवून आणू शकते आणि आलेल्या संकटांना कसे सामोरे जाऊ शकतात हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. युथ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह पाहता येणार आहे. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. राकेश कुडाळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी नारायणी, शशांक जाधव या कलाकारांचा समावेश आहे.तर विक्रम गोखले व सतीश पुळेकर या दिग्गज कलाकारादेखील या चित्रपटात झळकणार आहे. २० मे ला यूथ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.Web Title: Youth Movie Trailer Launch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.