This is 'Your Manus' film trailer | असा आहे 'आपला मानूस' सिनेमाचा ट्रेलर

अजय देवगण निर्मित 'आपला मानूस' या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे.चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.आपला मानूस चित्रपटाच्या टीझरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत असून याच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षित केले होते.नाना पाटेकर,सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.या ट्रेलर मध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून या भूमिका साकारल्या आहेत,अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी.तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे.वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो.ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे.मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबा विषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात.वायाकॉम18 मोशन पिक्चर्स चे सीओओ, अजित अंधारे म्हणाले,“आमचा २०१८ मधील पहिला मराठी सिनेमा-आपला मानूस - सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे एक असा सिनेमा ज्यातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आणि वेगळ्या कथा असलेले सिनेमे देण्याचा आमचा हेतू प्रतिबिंबीत होतो आहे.या सिनेमात नामवंत कलाकार काम करत आहेत नाना पाटेकर पासून ते सुमित राघवन आणि ईरावती हर्षे पर्यंत आणि या सर्वांचा कॅप्टन आहे अतिशय गुणवान दिग्दर्शक सतीश राजवाडे.आम्हाला अजय देवगण फिल्मस,वॉटरगेट प्रॉडक्शन्स आणि श्री गजानन चित्र हे आपला मानूस चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप चांगले भागीदार मिळाले आहेत.''नाना पाटेकर म्हणाले,“नटसम्राट नंतर,मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पहात होतो,एखादे असे पात्र जे ऐकताच क्षणी मला आवडेल आणि मारुती नागरगोजे मध्ये मला ते सापडले.ते एक क्लिष्ट पात्र आहे, मराठी सिनेमामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याच्या हावभाव आणि त्याच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे.”

वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स मराठी व कलर्स मराठी चे व्यवसाय प्रमुख,निखिल साने म्हणाले, “मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मुखत:वैविध्यपूर्ण कथा हाताळण्याचा प्रयत्न केला आहे ज्या आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे, साहित्याचे, आणि समाजाचे प्रतिबिंब दर्शवतात.सर्वात महत्वाचे म्हणजे,या सिनेमांना मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि तो बॉक्स ऑफिस वर दिसून येत आहे.सशक्त कथानक आणि उत्तम अभिनयाची जोड असलेला “आपला मानूस” हा सिनेमा आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आहे. नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे.मी आशा करतो कि,आपला मानूस हा सिनेमा २०१८ मधील सर्वात यशस्वी सिनेमा ठरेल.”
Web Title: This is 'Your Manus' film trailer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.