Your Archie, ie Rinku Rajguru, took admission in this college | तुमची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने या कॉलेजमध्ये घेतला प्रवेश

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हे नाव प्रसिद्ध झाले. या पहिल्यात चित्रपटाने तिला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. एवढेच नव्हे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील रिंकूने आर्ची ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे लोकांनी प्रचंड कौतुक केले होते. या चित्रपटात तिने कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका मुलीची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यात ती या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी कॉलेजमध्ये नव्हे तर शाळेत जात होती. तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत ६६ टक्के मिळवून ती पास देखील झाली. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रिंकूला शाळेत जाणेच अशक्य झाले होते. रिंकू जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी होत असे आणि त्यामुळे तिला घराच्या बाहेर देखील पडायला देखील जमत नव्हते. बाऊन्सरशिवाय ती आतादेखील कोणत्याही कार्यक्रमात पाहायला मिळत नाही. शाळेत जायला देखील तिला बाऊन्सची गरज लागत होती. पण शाळेच्या व्यवस्थापनाने याबद्दल विरोध केल्यावर तिने दहावी शाळेतून न देता बाहेरून देण्याचा निर्णय घेतला होता. 
दहावीनंतर आता रिंकूने कॉलेजला जायची स्वप्नं पाहिली होती. इतर मुलांप्रमाणे तिला देखील कॉलेजला जायचे होते. पण तिची लोकप्रियता अजूनही तितकीच आहे. त्यामुळे ती कॉलेजला गेल्यावर देखील तिच्याभोवती घोळका जमत आहे. त्यामुळे रिंकूची चांगलीच पंचाईत झाली आहे. कॉलेजमघध्ये जाणे शक्यच नसल्याने आता ती कॉलेजच्या परीक्षा देखील बाहेरूनच देणार आहे.
अकलूजमधील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेत तिने नववीपर्यंत शिक्षण घेतले होते आणि आता उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तिने एका लोकप्रिय विद्यालयात प्रवेश घेतला आहे.
रिंकूने नुकतेच मनसु मल्लिगे या चित्रपटात देखील काम केले होते. हा चित्रपट सैराटचा कन्नड रिमेक होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक करण्यात आले. तसेच आता रिंकू लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमाचे वाचन सध्या सुरू आहे. या सिनेमाची इतर माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली असून लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजतंय. 

Also Read : 'सैराट' सिनेमानंतर या मराठी सिनेमात झळकणार 'आर्ची'

Web Title: Your Archie, ie Rinku Rajguru, took admission in this college
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.