'Ye Re Ye Re Money' is seen in the celebration of celebration of celebration of movie, Anand celebrated | 'ये रे ये रे पैसा' सिनेमाचे कलाकार दिसले सेलिब्रेशन मुडमध्ये,असा साजरा केला आनंद

पार्टी करायची म्हटल्यावर खास निमित्त पाहिजे.सध्या बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी कलाकार प्रत्येक गोष्टीचा आनंद साजरा करताना दिसतात. कधी सिनेमाला मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन करण्यात येतं तर कधी फेस्टीव्हल,बर्थ डे पार्टी असे निमित्तांवर सेलिब्रेशन मुडमध्ये कलाकार पाहायला मिळतात. आता हाच ट्रेंड मराठीतही सेट होताना पाहायला मिळतोय. नुकतेच मराठी सिनेसृष्टीत आघाडीचे कलाकार एकाच फ्रेममध्ये दिसले.मस्त स्टायलिस अंदाजात सारेच या फोटोत सेलिब्रेशन मुडमध्ये दिसले. त्याला कारणही तसं खासच होतं ते म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'येरे येरे पैसा' हा सिनेमा.त्यानिमित्त चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि टीम उत्साहात दिसले.सिनेमाच्या टीमने केक कापून सेलिब्रेशनही केले. सर्वत्र सध्या रसिकांचे पसंतीस मिळवण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे. यासोबत अजून काही मराठी मालिकांचे सेलिब्रेशन त्यासोबत करण्यात आले आहे.'ये रे ये रे पैसा' चित्रपटांची संपूर्ण टीम तसेच अंजली आणि दुहेरी मालिकेमधील कलाकार आणि त्यांची टीमही यावेळी उपस्थित होती. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.'ये रे ये रे पैसा'च्या टीमने अमिताभ बच्चन यांची नुकतीच भेट घेतली आणि चित्रपटाच्या स्टारकास्टने बिग बीं सोबत क्वालिटी टाइम घालवला. ये रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती.गुरू या चित्रपटानंतर तब्बल दीड वर्षांनंतर संजय जाधव यांचा ये रे ये रे पैसा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.ये रे ये रे पैसा या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचा विषय हा वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी, थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून नवीन परिभाषा असलेला हा सिनेमा आहे.विशेष म्हणजे सिनेमातल्या एका दृश्यासाठी तब्बल ६० कॅमेरे वापरले आहेत. अशा प्रकारे अनेक विविध प्रयोगांनी नटलेला हा सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो आहे.  
Web Title: 'Ye Re Ye Re Money' is seen in the celebration of celebration of celebration of movie, Anand celebrated
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.