Wrestling screen with noisy multistars | विनोदी मल्टीस्टार्स गाजवताहेत वाघेऱ्याचा पडदा

 मराठी सिनेसृष्टीत आपल्या बहारदार विनोदांनी रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या, तर कधी डोळे पाणावणाऱ्या भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मात्तबर कलाकार जर एकत्र एकाच सिनेमात झळकलेतर? आणि तो सिनेमा जर विनोदी असेल तर? अगदी असेच काही आगामी 'वाघेऱ्या' सिनेमात प्रेक्षकाना अनुभवता येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित १८ मे रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा विनोदाचे चक्रीवादळचघेऊन महाराष्ट्रात धडकला आहे.  गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच 'बॉइज' सिनेमाचे निर्माते सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणिराजेंद्र शिंदे प्रस्तुत हा सिनेमा प्रेक्षकांना वाघेऱ्या नामक एका वेड्या गावाची सफर घडवून आणतो. 

नाशिकच्या एका छोट्या गावात घडलेल्या गोष्टीवर हा सिनेमा बेतला असून, हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांना सारे दुःख विसरून लोटपोट हसायला लावत आहे. कारण, एक, दोन नव्हे तर मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एवढ्यामोठ्या संख्येत एकत्र जमलेल्या विनोदी कलाकारांचा मेळाच 'वाघेऱ्या'मधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यांपैकी किशोर कदम, भारत गणेशपुरे , हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणिछाया कदम या आपापल्या अभिनयात अव्वल असलेल्या कलाकारांचा प्रमुख वावर या सिनेमात दिसून येतो. विशेष म्हणजे, नेहमीच धोतर सदऱ्यात दिसणारे ,गंभीर भूमिका बजावणारे किशोर कदम पहिल्यांदाच या सिनेमाच्यानिमित्ताने विनोदी व्यक्तीरेखेद्वारे लोकांसमोर आले आहेत. आपल्या या विनोदी भूमिकेबद्दल सांगताना, 'आतापर्यंतच्या प्रवासात मी पहिल्यांदाच विनोदी भूमिका करतो आहे आणि या चित्रपटात मला नेहमीसारख्या पेहरावपासूनअगदी वेगळा लुक साकारायला मिळाला त्यामुळे मी स्वतः देखील ही भूमिका करताना खूप उत्सूक होतो', असे किशोर कदम सांगतात. तसेच, किशोर कदम, हृषीकेश जोशी, लीना भागवत यांसारख्या कलाकारांच्याअभिनयातली विनोदी शैली आणि त्यांचे काम जवळून पाहता आले. या चित्रपटाच्या प्रवासात खूप काही गोष्टी नव्याने शिकायलादेखील मिळाल्या असल्याचे भारत गणेशपुरे सांगतात. 

वाघेऱ्या चित्रपटातील विनोद हे प्रासंगिक असल्यामुळे शूटिंगदरम्यान देखील कधीकधी कलाकारांनाच पोट धरून हसण्याची वेळ यायची तर अनेकदा सिनेमात घडणाऱ्या घटना ह्या आपल्या खऱ्या जीवनाशी सलंग्न असल्याचीजाणीव देखील कलाकारांना झाल्याचे ते सांगतात. या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रदर्शित झालेल्या गाण्यामधून या चित्रपटाची झलक प्रेक्षकांनी यापूर्वीच अनुभवली असल्याकारणामुळे, या हास्यमय दुनियेची सफर घडवणाऱ्या'वाघेऱ्या' सिनेमाचा आस्वाद प्रेक्षक नक्कीच घेतील, यात शंका नाही. 
Web Title: Wrestling screen with noisy multistars
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.