World television premiere of 'Talim' will be a movie | 'तालीम'चा सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

एक दशकापेक्षा जास्त झी टॉकीज या वाहिनीने सदाबहार आणि नवीन सिनेमे तसेच म्युजिक,कॉमेडी आणि मराठी नाटकं याद्वारे प्रेक्षकांना खिळवून सुध्दा ठेवलेले आहे. झी टॉकिज एक कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज आहे आणि त्याला प्रेक्षकांनी नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या मातीशी निगडित असलेला कुस्ती हा सर्वांचा लाडका आणि प्रसिद्ध खेळ आहे.पण हा खेळ नितीन मधुकर रोकडेंच्या तालीम या चित्रपटाचा मुख्य विषय आहे आणि त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे 25 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त झी टॉकिज वर.तालीम ही एका दत्तक कुस्तीपटूची कथा आहे जो सर्व संकटांवर मात करुन पुन्हा परत उभा राहतो.तालीम मध्ये कुस्तीपटू भाऊ (अभिजीत श्वेतचंद्र)ची कथा सांगीतलेली आहे जो महाराष्ट्र केसरी हा सर्वोच्च पुरस्कार मिळविण्याच्या कल्पनेने पछाडलेला आहे आणि त्यासाठी तो आयुष्यभर त्याचे प्रशिक्षण घेत आहे.जेव्हा तो त्याची शक्ती आणि युक्ती खऱ्या स्पर्धेत आजमावण्यासाठी सज्ज झालेला असतो तेव्हाच तो लक्ष्मीच्या प्रेमात पडतो.लक्ष्मी (वैशाली दाभाडे) ही एका तमाशा मंडळातील प्रमुख नर्तिका आहे.त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी जयसिंह (प्रशांत मोहिते) या परिस्थितीचा फायदा घेतो आणि बाजू उलटवितो.तालीमचे दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे बॉलिवूड मधील प्रख्यात संकलक आहेत आणि कुस्ती सारख्या प्राचीन खेळाच्या सर्व बाबी त्यांनी अचूकरीत्या मांडल्या आहेत.


या प्रिमियरच्या निमित्ताने नितीन रोकडे दिग्दर्शित 'तालीम' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत.त्याचबरोबर तालीम या चित्रपटात प्रेक्षकांना लावणीचं एक नवं लावण्य पाहायला मिळणार आहे.या चित्रपटातील 'इश्काचा बाण सुटला' ही लावणी केवळ कर्णमधुर नसून ती नेत्रसुखदही झाली आहे.या लावणीचं चित्रीकरण जुन्नरमधील घाटघर येथे खास भव्य दिव्य असा सेट उभारून करण्यात आलं आहे.या सेटवर अभिनेत्री वैशाली दाभाडे यांच्यावर ही लावणी चित्रीत करण्यात आली असून तालीममध्ये प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण अशी एक ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचे आघाडीचे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या लावणीला संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी संगीत दिले आहे. 
Web Title: World television premiere of 'Talim' will be a movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.