Will do anything for publicity, the trend of bold posters in Marathi! | ​पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा,मराठीत बोल्ड पोस्टरचा ट्रेंड!

सिनेमा हिट व्हावा यासाठी निर्माते वाट्टेल ते करायला तयार असतात.हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष मार्केटिंग तंत्र वापरलं जातं. सिनेमाच्या
प्रमोशनसाठी बॉलfवुडमध्ये विविध फंडे अवलंबले जातात.सिनेमाच्या ट्रेलरपासून ते टीझरपर्यंत विविध गोष्टींमधून रसिकांना सिनेमाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.सिनेमाच्या प्रमोशनमध्ये महत्त्वपूर्ण असते ते सिनेमाचं पोस्टर. जितकं आकर्षक पोस्टर तितके रसिक सिनेमाकडे आकर्षित होतात.सिनेमाच्या पोस्टरचे महत्त्व आज चर्चेत आलं नसून गेल्या कित्येक वर्षांपासून पोस्टरने सिनेमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.जुन्या जमान्यापासून ते आजतागायत पोस्टरमधून सिनेरसिकांना आकर्षित करण्यात येते.सुरुवातीच्या काळात अत्यंत साधं मात्र तितकेच आकर्षक असायचे.मात्र कालांतराने पोस्टरचे चित्र पालटले आहे.हिंदी सिनेमाचे पोस्टर वर्षानुवर्षे अधिकाधिक बोल्ड होत चालले आहे. गेल्या काही वर्षात साध्या पोस्टरची जागा बोल्ड, सेक्सी आणि हॉट पोस्टर्सनी घेतली आहे.बॉलिवूडचा हा ट्रेंड हळूहळू मराठी सिनेमातही दिसू लागला. मराठी सिनेमाचा प्रमोशन फंडाही बदलला आहे.हिंदी सिनेमांप्रमाणे मराठी सिनेमांचे पोस्टरही बोल्ड झाले आहेत.मराठी अभिनेत्रींनाही पोस्टरसाठी बोल्ड बिकीनी सीन देण्यात वावगं वाटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. असंच एका बोल्ड पोस्टरची चर्चा सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सुरु आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आगामी गुलाबजाम सिनेमाचे पोस्टरही तितकेच बोल्ड आहे.या पोस्टरवर सोनाली आणि सिद्धार्थचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.त्यामुळे हे पोस्टर सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे.गुलाबजाम सिनेमाच नाही तर याआधी विविध सिनेमांचे पोस्टर रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते.न्यूड या सिनेमाचे शीर्षक जितके वादग्रस्त होते तितकाच सिनेमाचा विषयसुद्धा बोल्ड होता. त्याचप्रमाणे या सिनेमाचे पोस्टरसुद्धा अधिक बोल्ड होते.याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका असलेला शटर,अडल्ट ओन्ली आणि चित्रफित या सिनेमाचे पोस्टरसुद्धा बोल्ड आणि हॉट होते.यामुळे सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे बोल्ड पोस्टरमुळे या सिनेमाची चर्चा झाली. मात्र या सिनेमाच्या शीर्षकाचाआणि त्याच्या बोल्ड पोस्टरचा तिकीट खिडकीवर किती परिणाम झाला,निर्मात्यांना कितपत फायदा झाला हा मात्र नक्कीच संशोधनाचा विषय म्हणावा लागेल.

Web Title: Will do anything for publicity, the trend of bold posters in Marathi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.