श्रिया पिळगावकर का पडली राजस्थानच्या प्रेमात?, ब्रिटीश टीव्ही सिरीजच्या शुटिंगसाठी गुलाबी शहरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 08:00 AM2018-11-04T08:00:00+5:302018-11-04T08:00:00+5:30

श्रियाला भारताचा इतिहास आणि भारतीय स्थापत्यकलेने विशेष आकर्षित केलं आहे. त्यामुळे राजस्थानात आल्यावर इथले राजमहल, राजवाडे यांना भेट द्यायला तिला आवडतं.

Why Shriya Pilgaonkar Love Rajasthan, shooting for british series in pink city | श्रिया पिळगावकर का पडली राजस्थानच्या प्रेमात?, ब्रिटीश टीव्ही सिरीजच्या शुटिंगसाठी गुलाबी शहरात

श्रिया पिळगावकर का पडली राजस्थानच्या प्रेमात?, ब्रिटीश टीव्ही सिरीजच्या शुटिंगसाठी गुलाबी शहरात

googlenewsNext

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रिअॅलिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रिया पिळगावकरसुद्धा अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' या पदार्पणाच्या सिनेमातून आपल्या वडिलांसह स्क्रीन शेअर करत रुपेरी पडद्यावर एंट्री मारलेल्या श्रियाने आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवण्यास सुरुवात केली. यानंतर ती किंग खान शाहरुखच्या 'फॅन' या सिनेमातही झळकली. शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे. आता श्रिया एका ब्रिटीश टीव्ही सिरीजमध्ये झळकणार आहे. गुरिंदर चढ्ढा यांच्या बीचम हाऊस या सिरीजमध्ये श्रिया काम करत आहे. 

यांत श्रिया चंचल ही व्यक्तीरेखा साकारत असून ती नावाप्रमाणेच चंचल, प्रचंड इच्छाशक्ती असणारी महत्त्वाकांक्षी आणि तितकंच सगळ्यात गोष्टीत कमालीची गुप्तता बाळगणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. सध्या या सिरीजचं शुटिंग सुरु आहे. पहिल्या शेड्युलचं शुटिंग लंडनमध्ये पार पडल्यानंतर बीचम हाऊसचं भारतात शुटिंग सुरू आहे. गुलाबी शहर जयपूरमध्ये हे शुटिंग सुरू आहे. इथं शुटिंग सुरू असल्याने श्रिया उत्साहित आहे. राजस्थानमध्ये तिने याआधीही शुटिंग केले आहे. तिचा पहिला पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय सिनेमा ऊन प्लस उनेचं शुटिंग राजस्थानातील उदयपूरमध्ये पार पडलं होतं. 

त्यामुळे आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या निमित्ताने राजस्थानमध्ये येऊन ती बरीच खूश आहे. श्रियाला राजस्थानमध्ये यायला नेहमीच आवडतं. हे तिचं आवडतं ठिकाण आहे. श्रियाला भारताचा इतिहास आणि भारतीय स्थापत्यकलेने विशेष आकर्षित केलं आहे. त्यामुळे राजस्थानात आल्यावर इथले राजमहल, राजवाडे यांना भेट द्यायला तिला आवडतं. राजस्थानमध्ये ज्यारितीने ऐतिहासिक वारसा जतन करण्यात आला आहे याचे तिला आकर्षण वाटते. त्यामुळे जयपूरच्या राजमहलांमध्ये बीचम हाऊसचे शुटिंग असल्याचे समजताच एक्साईटेड होतो असं श्रियाने सांगितले आहे. 

याशिवाय राजस्थानी थाळीचा आस्वाद घेणं आणि इथल्या बाजारपेठांमध्ये फेरफटका मारून शॉपिंग करायलाही तिला आवडतं. राजस्थान आणि इथली संस्कृती यावर श्रिया भलतीच फिदा झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरू नये. या टीव्ही सिरीजसह श्रिया अनुभव सिन्हा यांच्या 'अभी तो पार्टी शुरु हुई है' आणि इतर 2 प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे. 
 

Web Title: Why Shriya Pilgaonkar Love Rajasthan, shooting for british series in pink city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.