Why is Shekhar Phadke time to apologize? | ​का आली शेखर फडकेवर माफी मागण्याची वेळ?

शेखर फडकेने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जणांची माफी मागितली आहे. ही माफी त्याने का मागितली आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. शेखर फडके एका वेबसिरिजचे दिग्दर्शन करणार होता. पण काही कारणांनी त्याला त्याचा हा बेत रद्द करावा लागला. त्यामुळे त्याने ऑडिशनला आलेल्या कलाकारांची सोशल मीडियाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, नमस्कार... मित्र आणि मैत्रिणींनो.... काही दिवसांपूर्वी मी एक वेब सिरीज दिग्दर्शित करणार होतो आणि त्या साठी मी आणि प्रोड्युसर ,यांनी माझ्या घरी ऑडिशन घेतली होती. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलात, त्यासाठी आधी तुमचे आभार... मराठीच कलाकार नव्हे तर हिंदीमधीलसुद्धा कलाकार येऊन गेले... माझ्यावरचा तुमचा विश्वास तेव्हा मला दिसला, म्हणून हा माफीनामा..
ऑडिशन घेतल्यानंतर (आर्टिस्ट फायनल झाल्यावर) दुसऱ्या दिवशी मी करत असलेल्या वेब सिरीजच्या लेखकाला (वन लाईन) त्याच कथेसाठी सिनेमा चालून आला... म्हणून त्याने ही गोष्ट सांगितल्यावर निर्माते आणि मी त्याला आपल्या वेबसिरीज मधून मोकळा करून त्याला त्या कथेला मोठ्या पडद्यावर आणायला खुशीने हो म्हणालो... जेणेकरून त्याचे आर्थिक नुकसान व्हायला नको, अर्थात त्या लेखकाने मनापासून आभार मानले. म्हणून दुसरी एखादी कथा  मला आणि निर्मात्यांना पटेपर्यंत हे कार्य लांबणीवर पडले आहे...
खूप जणांकडून विचारणा झाली की काय झाले वेब सिरीजचे? नक्की करणार आहात का नाही? का नुसताच स्टंट होता? उगाच आमचा टाइमपास तर नाही ना केला.. ? पुढे तुमच्यावर, तुझ्यावर विश्वास ठेवायचा का नाही? असे अनेक प्रश्न मला विचारण्यात आले... त्याचे हे उत्तर म्हणून हा माफीनामा, गैरसमज करून घेऊ नका... एवढंच सांगेन की तुमची ऑडिशन आणि तुमचा वेळ नक्कीच वाया जाणार नाही.... माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी, तुमचा आधी विचार केला जाईल..... हे नक्की... आणि नक्की एकत्र काम करूया... पुन्हा एवढंच सांगेन.... Stay tune...... 

Also Read : ​शेखर फडके झळकणार जे आहे ते आहे या नाटकात
Web Title: Why is Shekhar Phadke time to apologize?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.