Who is Mukta Barve Miss? | ​मुक्ता बर्वे कोणाला करतेय मिस?

मुक्ता बर्वे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला खूप मिस करत असून तिने हे इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. मुक्ता बर्वेची ही लाडकी मैत्रीण ही दुसरी कोणीही नसून दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी आहे. मुक्ताने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर रसिकासोबतचा तिचा एका फोटो पोस्ट करून त्यासोबत एक छानशी कॅप्शन लिहिली आहे. मुक्ताने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, रस्की जिथे असशील तिथे तुझ्या मिश्किल, उत्साही आणि औत्सुक्याच्या अंदाजाने मौज करत असशील याची मला खात्री आहे… त्यासोबत मी तुला खूप मिस करत आहे असे देखील तिने लिहिले आहे. 
मुक्ता बर्वेचा आम्ही दोघी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुक्ताने आपल्या मैत्रिणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रसिका जोशी ही खूपच चांगली अभिनेत्री होती. तिने तिच्या छोट्याशा कारकिर्दीत एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारल्या. रसिकाने प्रपंच, हसा चकट फू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच तिने अनेक नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिने तिची एक जागा निर्माण केली होती. दिग्दर्शक प्रियदर्शन यांची तर ती आवडती अभिनेत्री होती. त्यांच्या भूलभुलैय्या, मालामाल विकली आणि ढोल या चित्रपटात रसिकाने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. लुकेमिया या आजाराने २०११ साली रसिकाचे निधन झाले.
चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या आम्ही दोघी या आगामी मराठी चित्रपटात त्या दोघींच्या वेगळ्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर आणि सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहीत असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे. तसेच या चित्रपटाची पटकथा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची आहे आणि सवांद भाग्यश्री जाधव यांनी लिहिले आहेत.

Also Read : आम्ही दोघी या चित्रपटासाठी मुक्ता बर्वेने शिकली ही गोष्ट

Web Title: Who is Mukta Barve Miss?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.