Who is involved with the fame of Neha Ghad | ​मन उधाण वाऱ्याचे फेम नेहा गर्दे कोणासोबत अडकली लग्नबंधनात?

मन उधाण वाऱ्याचे या कार्यक्रमामुळे नेहा गर्दे प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने साकारलेली गौरी ही भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेनंतर तिने मोकळा श्वास या चित्रपटातही काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. तसेच ती अजूनही चांद रात आहे या चित्रपटात देखील झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून नेहा अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. त्यामुळे ती सध्या काय करत आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. नेहा चित्रपट अथवा मालिकेत काम करत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे तिला तिचे फॅन्स मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. 
नेहाने सोशल मीडियावर नुकत्याच टाकलेल्या एका फोटोची चांगलीच चर्चा होत आहे. नेहा या फोटोत एका वधूच्या वेशात पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून नेहाने लग्न तर केलं नाही ना असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत आहे. नेहा कोणासोबत लग्नबंधनात अडकली याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागली आहे. पण हा फोटो हा तिच्या खऱ्या आयुष्यातील नसून एका चित्रीकरणाच्या वेळेचा आहे. नेहानेच या फोटोसोबत काही टॅग दिले आहेत. या टॅगवरून तिचा हा फोटो चित्रीकरणाच्या वेळेचा असल्याचे आपल्याला कळून येत आहे. शुटिंग सीन, ब्राइड लूक, वेडिंग सिक्वेन्स, नवीन चित्रपट, गडबड झाली असे टॅग तिने या फोटोसोबत दिले आहेत. यावरून तिच्या गडबड झाली या आगामी चित्रपटातील हा फोटो असून या चित्रपटात ती वधूच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळून येत आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
नेहा या फोटोत खूपच छान दिसत असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्यांना हा नेहाचा लूक आवडला असल्याचे त्यांनी प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे. 
Web Title: Who is involved with the fame of Neha Ghad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.