Who is this girl with Shashank Ketkar? | ​शशांक केतकरसोबतची ही मुलगी कोण?

आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे आपल्याला दिसत आहे. चित्रपट, मालिकेतील कलाकार तर आपल्या फॅन्सच्या सतत संपर्कात राहाण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही ना काही पोस्ट करत असतात. हे कलाकार आपल्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आपल्या चाहत्यांना देत असतात. होणार सून मी या घरची या मालिकेमुळे सर्वांच्या घराघरात पोहचलेला शशांक केतकर आजकाल जास्तच चर्चेत दिसत आहे ते म्हणजे त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्ट वरून. त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे, त्यात तो एका मुलीसोबत एक रँडम पोज देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हॅनिटी व्हॅन जवळ काढण्यात आलेल्या शशांकच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. शशांकसोबत या फोटोमध्ये मुलगी कोण आहे हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. 

Shashank Ketkar

शशांक सोबत झळकणारा हा सुंदर चेहरा आहे अभिनेत्री रीना अग्रवाल हिचा! टेलिव्हिजन मधून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या रीनाला नेहमीच दमदार भूमिका मिळाल्या आहेत. तो क्या मस्त है लाईफ या मालिके मधील रिया, एजन्ट राघव मधील डॉक्टर आरतीची भूमिका यांसारख्या तिच्या भूमिका आजवर गाजल्या आहेत. रीनाने हिंदी मालिकांप्रमाणेच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. सोनाली कुलकर्णीच्या अंजिठा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या तलाशमध्ये देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. 
सोशल मीडिया हा अभिनेता आणि फॅन्स मधील दुआ आहे आणि हीच गोष्ट अतिशय चांगल्या रीतीने समजलेल्या शशांकने आपल्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर रीना सोबतचा एक फोटो पोस्ट करून आपल्या या प्रोजेक्ट मध्ये आपल्या सोबत असणारी नवी अभिनेत्री अशी तिची ओळख करून दिली आहे. शशांकने रिनासोबतचा हा फोटो पोस्ट केल्यानंतर आता त्यांचा हा चित्रपट कोणता असणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. शशांकच्या फॅन्सना त्याच्या या चित्रपटासाठी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.  

Also Read : का आणि कुणावर संतापला शशांक केतकर?वाचा सविस्तर
Web Title: Who is this girl with Shashank Ketkar?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.