When this happened, Hina Panchal paused the item song in this film | ​काय झालं कळंना या चित्रपटात हिना पांचाल थिरकणार आयटम साँगवर

हिंदी चित्रपटांप्रमाणे आता मराठी चित्रपटातही आपल्याला आयटम साँग पाहायला मिळत आहेत. अनेक प्रसिद्ध नायिका सध्या आयटम साँगवर थिरकताना दिसत आहेत. आता आणखी एका मराठी चित्रपटात प्रेक्षकांना आयटम साँग पाहायला मिळणार आहे.
बॉलीवूड आणि टॅालिवूडला आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री हिना पांचाल आता मराठी चित्रपटात आपला जलवा  दाखवणार आहे. हिना पांचालने याआधी लाइफ में है ट्विस्ट, जस्ट गंमत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आङे. बलम बम्बई आणि बेवडा बेवडा झालो मी टाईट या दोन आयटम साँगसाठी ती चांगलीच प्रसिद्ध आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत ‘काय झालं कळंना’ या मराठी चित्रपटात हिना पांचाल या प्रसिद्ध अभिनेत्रीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत करण्यात आले आहे.
काय झालं कळंना या चित्रपटातील ‘टकमक टकमक नजरा तुमच्या, होऊ दे आता बत्ती गुल’ असे बोल असलेल्या या हटके आयटम साँगचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या आयटम साँगची कोरिओग्राफी सुजीत कुमार यांनी केली आहे. संगीतकार पंकज पडघन यांनी आजवर अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. पण त्यांचे हे पहिलेच आयटम साँग आहे. वलय मुलगुंद यांनी हे गीत लिहिले असून या आयटम साँगवर थिरकायला हिना खूप उत्सुक होती. या गाण्याविषयी ती सांगते, हे गाणे चित्रीत करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम साँग ठेका धरायला लावेल असा मला विश्वास आहे. 
या चित्रपटातील हिना पांचालचा असलेला हॉट अंदाज या चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार आहे. ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातून वेगळ्या धाटणीची हलकी–फुलकी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची  निर्मिती पंकज गुप्ता यांची असून दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांचे आहे. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Also Read : नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत ‘काय झालं कळंना...’
 
Web Title: When this happened, Hina Panchal paused the item song in this film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.