What's up! Celebrate Valentine's Prayer in a Wedding Movie as a Great and Glorious Philosopher | What’s up लग्न चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी असा केला व्हॅलेंटाइन सेलिब्रेट

‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. ‘What’s up लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार असल्याने ही जोडी यंदाचे ‘व्हॅलेंटाइन कपल’ आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हटला की दिवसभर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत धमाल करायची. सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा. यात भेटवस्तू देणं, कॅाफी शॅापमध्ये जाऊन गप्पा मारणं, निसर्गरम्य स्थळी जाऊन आपल्या जीवनातील रोमँटिक क्षण कैद करण्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तीला जे आवडतं, ते करण्यातच स्वत:चा आनंद मानणं हे सुद्धा आलंच. वैभव-प्रार्थना हे यंदाचे व्हॅलेंटाइन कपल ‘What’s up लग्न’ या चित्रपटात अशाच प्रकारचे रोमँटिक क्षण साजरे करताना दिसणार आहे.
फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट १६ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
प्रार्थना आणि वैभवला एकत्र पाहाण्याची फॅन्सची इच्छा पूर्ण होणार असल्याचे वैभवनेच काही दिवसांपूर्वी ट्विटर या सोशल नेटवर्किंगद्वारे त्याच्या फॅन्सना सांगितले होते. वैभवने त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवर प्रार्थनासोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि या फोटोत त्याने म्हटले होते की, खूप मोठ्या कॉफी ब्रेकनंतर मी प्रार्थनासोबत एक नवा चित्रपट करत आहे. त्यानेच या पोस्टसोबत व्हॉट्सअॅप लग्न या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. 
कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर कॉफी आणि बरेच काही या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. वैभव आणि प्रार्थनाला या चित्रपटाच्या सिक्वलबाबत नेहमीच विचारले जाते. या चित्रपटानंतरच त्या दोघांच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Also Read : ‘मणिकर्मिका’ सिनेमाच्या सेटवर अभिनेता वैभव तत्त्ववादीची ‘क्षणभर विश्रांती’,अभिनेत्री अंकिता लोखंडेसह शेअर करणार स्क्रीन
Web Title: What's up! Celebrate Valentine's Prayer in a Wedding Movie as a Great and Glorious Philosopher
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.