What is the thing that Amrita Khanvilkar is not keeping fit? | ​कोणती गोष्ट आहे जी अमृता खानविलकरला स्वस्थ बसू देत नाहीये?

अमृता खानविलकर आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिने तिच्या अभिनयाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले. एवढेच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच नच बलिये या कार्यक्रमाचे तिने तिचे पती हिमांशू मल्होत्रासोबत विजेतेपद मिळवले आहे. ती सध्या डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची भूमिका साकारत आहे. डान्स इंडिया डान्सचा हा सहावा सिझन असून यासाठी अमृता प्रचंड मेहनत घेत आहे. कोणत्याही हिंदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. अमृताच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या फॅन्सना तिच्या चित्रीकरणाबद्दल अपडेट देत आहे.
अमृताच्या फिटनेसचे नेहमीच कौतुक केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, फिट राहाण्यासाठी तिला अनेक तास मेहनत घ्यावी लागते. ती नेहमीच व्यायाम करते. एकही दिवस व्यायाम करणे, जॉगिंग करणे ती चुकवत नाही. तिची व्यायाम करण्याची सवय तिला स्वस्थच बसू देत नाही असे तिचे म्हणणे आहे. तिने फेसबुकला याबाबतीत एक नुकतीच पोस्ट लिहिली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज माझी नियमित व्यायाम करण्याची वेळ जरा हुकलीच, मनात आले राहू दे... पण दररोजची व्यायाम करण्याची सवय स्वस्थ बसू देत नव्हती, कसं बसं स्वतःला तयार केले आणि मनात निश्चय केला जायचंच.... चूक पण आपलीच आहे उशिरा उठले मी... मग शुज घातले घराजवळच्या जॉगिग ट्रॅकवर पोहचल्यावर नेहमी सारखीच ऊर्जा अंगात संचारली... मग मस्त पैकी तीन किमी पळाले. फ्रेश वाटलं दिवसाची सुरुवात छान झाल्यासारखी वाटली. स्वतःला वेळ दिल्यामुळे मन प्रसन्न झाले... बस्स व्यायाम म्हणजे अजून काय असते नाही का.... स्वत:ने स्वतःसाठी काढलेला वेळ... मग त्यात तुम्ही काही करा जॉगिंग, योगा, जिम पर्याय भरपूर आहेत. पण नक्की करा कारण इतकं तर आपण स्वतःसाठी करूच शकतो नाही का....???

Also Read : अमृता खानविलकरचे तिच्या आईसोबतचे फोटो पाहिलेत का?
Web Title: What is the thing that Amrita Khanvilkar is not keeping fit?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.