What is the secret behind this photo of Subodh Bhave and Prajakta Mali? | सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी यांच्या या फोटोमागचं गुपित काय?

भारदस्त आवाज आणि चोखंदळ, हरहुन्नरी अभिनेता म्हणून सुबोध भावे याची ओळख.आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे सुबोध भावेने आपली छाप रसिकांवर पाडली आहे.आता लवकरच सुबोध भावे एक नाही तर  तब्बल 11 सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.11 सिनेमांपैकी काही सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. तर काही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.काही सिनेमांच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे.त्यामुळे आगामी काळातही सुबोध भावे आपल्या रसिकांना मनोरंजनाची ट्रीटच देणार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.योग्य वेळ बघून सुबोध आपल्या आगामी सिनेमांविषयी खास बातमी देत राहणार आहेच.तुर्तास सुबोधने सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळीसोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुसता फोटोच शेअर केला नसून लवकरच प्राजक्ता आणि सुबोध ही जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याचेही सुबोधने यावेळी सांगितले.या सिनेमाविषयी अधिक माहिती गुलदस्त्यात असून लवकरच सिनेमाच्या शूटिंग सुरूवात होणार असल्याचे समजतंय.अशाप्रकारे सुबोध आणि प्राजक्ता पहिल्यांदाच ही जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.त्यामुळे वेगवेगळ्या मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातूनरसिकांची मनं जिंकलेले सुबोध आणि प्राजक्ता जेव्हा रूपेरी पडद्यावर एकत्र येतील तेव्हा काय कमाल करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Pics:प्राजक्ता माळीने पुन्हा केले ग्लॅमरस Photo shoot

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे अल्पावधीत रसिकांची लाडकी बनली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. याआधीही तिने सुवासिनी, बंध रेशमाचे, गाणे तुमचे आमचे, सुगरण अशा मालिकांमध्ये काम केलं होतं. खो-खो, संघर्ष, गोळाबेरीज अशा मराठी सिनेमांमध्येही प्राजक्ताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्राजक्ताची नकटीच्या लग्नाला यायचं हं, ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेतील प्राजक्ताचा खट्याळ अंदाज आणि पारंपरिक लूक रसिकांना चांगलाच भावतो आहे. अभिनयासह तिचा लूक चर्चेचा विषय ठरतो आहे. मराठमोळ्या घरातील मराठमोळी मुलगी साकारणारी प्राजक्ता रसिकांची फेव्हरेट ठरत आहे.
Web Title: What is the secret behind this photo of Subodh Bhave and Prajakta Mali?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.