What is the secret behind this photo of Rishikesh Joshi? Read detailed | ऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित काय?वाचा सविस्तर

आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. आपला आवडता कलाकार  सध्या काय करतोय,कोणत्या मालिकेत, नाटकात किंवा सिनेमात तो  काम करतोय  याबाबत माहिती घेण्याची त्यांच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता असते.आपल्या विविधांगी भूमिकेतून ऋषिकेश जोशीने रसिकांची मनं जिकंली आहेत.लाखो फॅन्सला ऋषिकेशला सोशल मीडियावरही फॉलो करतात.सध्या सोशल मीडियावरील ऋषिकेशचा एक फोटो सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो.अनेकांना हा फोटो पाहून विविध प्रश्न पडत आहेत.या फोटोत ऋषिकेश नवरदेवप्रमाणे तयार झाल्याचे पाहायला मिळतो आहे.त्यामुळे आता फोटो नेमका कसला आहे अशा चर्चा सुरु आहेत. या फोटोचं वास्तव काय असे अनेक प्रश्न सध्या त्याच्या फॅन्सना पडले आहेत.तर या फोटो मागचं खरं कारण आहे त्याचा आगामी सिनेमा.ज्यात तो वेड्या गावचा शहाणा अधिकारीच्या भूमिकेत झळकणार आहे.

'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टॅगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे.गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या, तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या आगामी 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे ऋषिकेश जोशी झळकणार आहे.धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून, 'वाघेऱ्या' नामक वेड्यांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत तो दिसणार आहे.समीर आशा पाटील दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्याची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.लग्नाच्या बोहल्यावरून थेट कामावर रुजू झालेल्या,एका नवविवाहित तरुणाची कैफियत यात  ऋषिकेश मांडणार आहे.आतापर्यंत सदरा, झब्बा तसेच पायजमामध्ये दिसणारा ऋषिकेश या सिनेमात मात्र शहरी बाबूच्या लुकमध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामीण जीवनातील हलके फुलके विनोद मांडणाऱ्या या सिनेमात ऋषिकेशबरोबरच,  किशोर कदम, भारत गणेशपुरे, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोदवीरांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हास्याची  तुफान आतषबाजी करणाऱ्या या सिनेमातील 'वाघेऱ्या' गावाची गम्मत अनुभवायची असेल, तर येत्या १८ मे पर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.वेड्यांच्या या गावात जाण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक झाले असतील हे निश्चित !
Web Title: What is the secret behind this photo of Rishikesh Joshi? Read detailed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.