What is happening in Saally Sanjeev, Suvrat Joshi, Anjali Patil and Mrinalai Deshpande London? | ​सायली संजीव, सुव्रत जोशी, अंजली पाटील आणि मृण्मयी देशपांडे लंडनमध्ये करतायत काय?

सायली संजीव आणि सुव्रत जाशी काही दिवसांपूर्वीच लंडनला रवाना झाले असल्याचे आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सायली काहे दिया परदेस या मालिकेमुळे नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या गौरी या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची ही मालिका बंद झाल्यामुळे प्रेक्षक तिला प्रचंड मिस करत आहेत. या मालिकेत ती अतिशय साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण आता प्रेक्षकांना ती एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सायली आता एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे आणि या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील कोणत्या भागात नव्हे तर थेट लंडनमध्ये सुरू आहे आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सायली लंडनला रवाना झाली होती. लंडनला जाण्यापूर्वी तिने विमानतळावरचा एक फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करून ती लंडनला रवाना होत असल्याचे तिच्या चाहत्यांना सांगितले होते. तिच्यासोबतच त्याच दिवशी सुव्रत जोशीने तो लंडनला जात असल्याची फेसबुकला पोस्ट केली होती. त्यामुळे ते दोघे एकाच चित्रपटाच्या चित्रीकणासाठी लंडनला रवाना झाले असल्याचे सगळ्यांना कळले होते. पण आता सायली आणि सुव्रतच नव्हे तर आणखी दोन मराठी कलाकार लंडनमध्ये पोहोचले आहेत.
सायली, सुव्रतसोबतच मृण्मयी देशपांडे आणि अंजली पाटील लंडनमध्ये असून ते दोघे एकाच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अंजली पाटीलनेच इन्स्टाग्रामवर या चोघांचे लंडनमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ते चौघेही मजा-मस्ती करत असताना आपल्याला दिसत आहेत. या फोटोसोबत परदेशात आमची मैत्री होत असल्याचे कॅप्शन देखील अंजलीने टाकले आहे. 
या चित्रपटाचे नाव काय असणार, तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती कोण करत आहेत यावर सुव्रत, सायली, मृण्मयी आणि अंजली यांनी मौन राखणेच पसंत केले आहे. 
सुव्रत, सायली, मृण्मयी आणि अंजली लंडनवरून परतल्यावर तरी त्यांच्या या नव्या इनिंगविषयी सगळ्यांना सांगतील अशी आशा करायला हरकत नाही. 

Read : काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?

Web Title: What is happening in Saally Sanjeev, Suvrat Joshi, Anjali Patil and Mrinalai Deshpande London?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.