What is the habit of forgetting actor Chinmay Mandlekar? You will not even be surprised if you listen to it | अभिनेता चिन्मय मांडलेकरला काय विसरण्याची सवय आहे? ऐकून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही

cnxoldfiles/a> नाव घ्यावं लागेल. कारण चिन्मयला विसरण्याची एक अशी सवय आहे की तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. चिन्मयला त्याची स्वाक्षरी (सही) विसरण्याची सवय आहे. ब-याचदा आपल्याला चेकबुक किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी स्वाक्षरी (सही) करावी लागते. कोणताही गोंधळ नको म्हणून आपण ती स्वाक्षरी सगळीकडे एकच राहिल याची काळजी आपण घेतो. बँकांमध्ये स्वाक्षरी पडताळणीसुद्धा होते. त्यामुळे बँकेच्या संबंधित कामांसाठी अर्ज करताना केलेली स्वाक्षरी कायम ठेवण्याची काळजी प्रत्येकजण घेत असतो. मात्र याला चिन्मय अपवाद आहे. कारण दरवेळी तो आपली स्वाक्षरी विसरतो. याचा खुलासा खुद्द चिन्मय मांडलेकरने छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मराठी कॉमेडी शोमध्ये केला आहे. स्वाक्षरी विसरण्याचा फटकाही चिन्मयला वेळोवेळी बसला आहे. एकदा फ्लॅटची रक्कम अदा करण्यासाठी चिन्मयला चेक द्यायचा होता. त्यावेळी चिन्मयने त्याच्या विसरण्याच्या सवयीमुळे बँकेतील नेहमीच्या स्वाक्षरीपेक्षा वेगळीच स्वाक्षरी त्याने चेकवर केली. त्याचा परिणाम असा झाला की चिन्मयने दिलेला हा चेक बाऊन्स झाला. हे एकदा नाही तर वारंवार घडल्याचेही त्याने सांगितले. खुद्द चिन्मयने दिलेल्या या कबुलीमुळे या शोमध्ये उपस्थितांना आपलं हसू अनावर झालं.
Web Title: What is the habit of forgetting actor Chinmay Mandlekar? You will not even be surprised if you listen to it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.