सहज मिळते ते यश कुठलं?, पडद्यामागे पाहा नशीबवान भाऊ कदम किती करतो मेहनत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 08:00 AM2018-11-25T08:00:00+5:302018-11-25T08:00:00+5:30

'नशीबवान'  हा सिनेमा  उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असून, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी या सिनेमाची  निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

What are they able to get easily? See behind the scenes Of Bhau Kadam New Movie Nashibvaan | सहज मिळते ते यश कुठलं?, पडद्यामागे पाहा नशीबवान भाऊ कदम किती करतो मेहनत?

सहज मिळते ते यश कुठलं?, पडद्यामागे पाहा नशीबवान भाऊ कदम किती करतो मेहनत?

एखादा चित्रपट यशस्वी करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेत असतात. त्यांच्या पात्राला जिवंतपणा आण्यासाठी हरप्रकारे काम करण्यास ते तयार असतात. याचे आताचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ कदम यांचा आगामी ‘नशीबवान’ चित्रपट. या चित्रपटामध्ये  भाऊ सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका साकारत आहे. ही भूमिका खरी वाटावी म्हणून भाऊ यांनी खरोखर कचरा उचलून सफाई केली आहे. यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितले तसेच सार्वजनिक स्वछता गृहाची सफाई देखील करायला लावली.

 

या चित्रपटाची बहुतांशी शूटिंग ही मुलुंड मध्ये झाली आहे. याबाबत भाऊ कदम याच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की या चित्रपटाच्या निमित्याने मी सफाई कामगाराच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या, त्यांना होणारे आजार, समाजाकडून त्याची होणारी हेटाळणी हे सर्व बघताना स्वतःचा तिरस्कार वाटायला लागला कारण आपला कचरा साफ करण्यासाठी ते लोक घाणीमध्ये राहतात.

 

"खरंच खूप ग्रेट आहे ही लोक आपले आरोग्य नीट राहावे आपण स्वच्छते मध्ये राहावे यासाठी रात्रंदिवस झटणारे हे कामगार माझ्यासाठी खरे हिरो ठरले आणि माझ्या मनात त्याच्या बद्दल शब्दात  व्यक्त  होऊ न शकणारा सन्मान निर्माण झाला."

 

'नशीबवान'  हा सिनेमा  उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असून, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी या सिनेमाची  निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल याची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे  दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, सिनेमाचे  निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहे. सोबतच  प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

याविषयी भाऊ कदमने सांगितले की, आजही जे काही काम करतो ते जबाबदारीने करतो. कोणतंही काम करायचं म्हणून अजिबात करत नाही. आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. आजही खूप काम करायची इच्छा आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. समोरच्या व्यक्तीला म्हणजे रसिकांना मी कोणत्या भूमिकेत पाहायला आवडेन त्या भूमिका मला करायच्या आहेत. कॉमेडी असेल तर कॉमेडी किंवा अन्य कोणतीही भूमिका जी रसिकांना आवडेल ती भूमिका करायची आहे.

Web Title: What are they able to get easily? See behind the scenes Of Bhau Kadam New Movie Nashibvaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.