Welcome 'Welcome' to 'Gods' Home | 'देवा' च्या घरात 'अफलातून' स्वागत

इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवाया १ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या सिनेमाच्या चर्चेला आता वेग आला आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीचे अनोखे फंडे लोकांना आवडत आहेत. नुकत्याच या सिनेमाच्या ट्रेलरचे आणि प्रमोशनल साँगचे एका हटके अंदाजात रंगीत सोहळा पार पडला. 'देवाया सिनेमातील प्रमुख पात्राचे अतरंगी घर त्यासाठी उभारण्यात आले होते. विविध आश्चर्यांनी या घरात उपस्थितांचे जंगी स्वागत करण्यात आले. 
 

दिग्दर्शक मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवाया अतरंगी पात्राचे पोस्टर जितका कलरफुल आहेतितकाच कलरफुल या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळाला.  अंकुशचा देवा’ लूक  आणि तेजस्विनीच्यामाया’ या भूमिकेबरोबरच आणखी एक गोड धक्का मिळालातो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील या सिनेमामध्ये आहे. शिवाय दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचीदेखील झलक यात दिसत असल्यामुळेत्यांच्या आठवणीलादेखील या कार्यक्रमात उजाळा मिळाला.
 

यानंतर अजून एक सुखद धक्का म्हणजे, ‘देवाचे प्रमोशनल साँग! अजय गोगावले यांचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असूनप्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने वेगळ्या पठडीतले गाणे अजयने गायले आहे. 
 

क्षितिज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले असून, 'देवाच्या व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे सिनेरसिकांना नक्कीच आवडेल. आयुष्याची विस्कटलेली घडी उलगडणारा हा 'देवा', प्रेक्षकांना पडलेले एक कोडे असूनसिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे कोडे सुटणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही 'देवाया चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा या देवा’ च्या अतरंगी घरात ट्रेलर आणि म्युझिक लाँचबरोबर अनेक सुखद धक्क्यांनी पाहुण्यांची संध्याकाळ रंगतदार झाली.  

देवा सिनेमाने प्रमोशसाठी एक भन्नाट कल्पना शोधुन काढली होती. ती म्हणजे महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम.मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे. 

 


Web Title: Welcome 'Welcome' to 'Gods' Home
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.