Wedding Album: A photo of Aarthi Velankar's wedding took place, Marwadi was married | Wedding Album:आरोह वेलणकरच्या लग्नाचे फोटो आले समोर,मारवाडी पद्धतीने पार पडले लग्न

'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकरने 11 डिसेंबरला अकिंता शिंगवीसह विवाबबंधनात अडकला.विशेष म्हणजे आरोह हा मराठी तर अंकिताही मारवाडी असल्यामुळे अंकिताच्या पारंपारिक पद्धतीनुसार म्हणजेच मारवाडी पद्धतीने या दोघांनी लग्न केले.यावेळी या लग्नसोहळ्याला आरोह आणि अंकिताचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय.या फोटोंमध्ये नववधू अकिंताचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.आरोहच्या लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नानंतर यांचे रिसेप्शन मुंबई आणि पुणे याठिकाणी होणार आहे.अंकिताही पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही.महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताने डेस्टिनेशन वेडिंग केले आहे. आरोह अभिनेता असण्यासोबतच इंजीनिअरसुद्धा आहे.त्यामुळेच आपल्या लग्नासाठी त्याने खास मोबाईल अॅपही तयार केले होते.आरोह वेड्स अंकिता या अॅपद्वारे लग्नात घडणा-या प्रत्येक गोष्टीचे अपडेट निमंत्रितांना कळणार होते. त्यामुळे आपल्या जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी आरोहने कोणतीही कसर सोडली नव्हती.

Also Read:या अभिनेत्याचे प्री-वेडिंग फोटो शूट पाहून तुम्हाला बॉलिवूड सिनेमांची आठवण येईल!आरोहनेसुद्धा आपल्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोशूटसाठी त्याने बॉलिवूडच्या विविध गाजलेल्या सिनेमांच्या सेटचा वापर केला आहे.'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या विविध सिनेमांच्या सेटवर आरोह आणि अंकिताचे प्री-वेडिंग फोटोशूट झाले आहे.या फोटोत आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताना आरोहने प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचेही आभार मानले आहेत.प्री-वेडिंग फोटोशूटसाठी हे सेट उपलब्ध करुन दिल्याबद्दल आरोहने त्यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत.प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार रेशीमगाठीत अडकले आहेत.त्यामुळे या यादीत आरोह वेलणकरचेही नाव सामिल झाली आहे.

Web Title: Wedding Album: A photo of Aarthi Velankar's wedding took place, Marwadi was married
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.