Vocational enviable culture, in front of the photo | संस्कृती बालगुडे करतेय व्हॅकेशन एन्जॉय,समोर आले Photo

कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात. सध्या असाच वेळ काढुन संस्कृती बालगुडे थायलंडला रवाना झाली. थायलंडमध्ये क्लिक केलेले तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.फोटोत ती मस्त निवांत क्षण एन्जॉय करताना दिसतेय.निसर्गाच्या सानिध्यात एकांत घालवताना फोटोत पाहायला मिळतंय.त्याचबरोबर नेहमीप्रमाणे फोटोत तिचा ग्लॅमरस लुकही पाहायला मिळत आहे.सिनेमा स्वीकारताना ती फार सिलेक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळते. मात्र हीच संस्कृती सुरुवातीला अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत फारशी गंभीर नव्हती. त्याचवेळी अभिनेत्री सुमुखी पेंडसेने संस्कृतीला एक सल्ला दिला. तिने संस्कृतीला THE DEVILS WEARS PRADA हा हॉलीवुडचा सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला.त्यानुसार संस्कृतीने हा सिनेमा पाहिला. हा हॉलीवुडचा सिनेमा पाहून आपल्यात बदल घडल्याची कबुली खुद्द संस्कृतीने दिली आहे. सांगतो ऐका या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.येत्या काही दिवसांत 'दिल-दिमाग-बत्ती', 'लग्न मुबारक' आणि 'बेभान' असे सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत. मिलिंद शिंदे दिग्दर्शित सिनेमातही ती काम करणार असून त्याचं शीर्षक अद्याप ठरलेले नाही. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.सिनेमा स्वीकारताना पटकथा आणि सहकलाकारांना ती महत्त्व देते. 

Also Read:छोट्या पडद्यावरील ही 'मॅडम'च्या सेक्सी अदांचे मालदीवमध्ये जलवे, सोशल मीडियावर फक्त तिच्या बिकीनी फोटोंची चर्चा

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली आहे.या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. अवघ्या काही दिवसांत नेहाची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. आपल्या सहका-यांशी बिनधास्त फ्लर्ट करणारी बॉस रसिकांना चांगलीच भावली आहे.मालिकेत आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी नेहा प्रत्यक्ष जीवनातही आपल्या मादक अदांची जादू दाखवत आहे.नेहा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.याच व्हेकेशनचे काही फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.मालदीवमध्ये नेहा सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळत आहे.त्यात नेहा एका स्विमिंग पूल शेजारी बिकीनीमध्ये दिसत आहे.

Web Title: Vocational enviable culture, in front of the photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.