The villain unfolds life's journey | खलनायकाने उलगडला जीवन प्रवास

 
         आशिष विदयार्थी यांचा खलनायकी अंदाज मोठ्या पडद्यावर आपण पाहिलाच आहे. बोलण्यातील लकब आणि लक्षवेधी अभिनयशैली यामुळे आशिषजींच्या खलनायकी रूपाचे देखील चाहते आपल्याला पाहायला मिळतील. नूकतीच आशिष विदयार्थी यांनी लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटित त्यांचा जीवनप्रवास उलगडला. जगण्याची नवी उमेद देणारा जीवनमंत्र देखील या खलनायकाने विनोदी अंदाजात शेअर केला. 
            
           नाटकांमध्ये काम सुरु असताना मी मुंबईला आलो. त्यावेळी मला माझ्यातील हुनर समजला. स्वत:मध्ये काही गोष्टी शोधल्यावर मला समजले मी अभिनेता पण आहे.  मग मी खुप वेगळ््या प्रकारचे रोल केले. टाईप कास्ट होतोय असे देखील मी ऐकले. काही दिवसांनंतर मला अ‍ॅक्टींगसाठी पैसे मिळू लागले. मला जेव्हा १५०० रुपये मिळाले तेव्हा मी त्यातील शुन्य पुन्हा पुन्हा मोजत होतो. ते पैसे मिळाल्याचा आनंद काही  औरच होता. त्या पैशातून मी आईला साडी घेतली होती.
 
 हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर  मी मद्रासला गेलो. हिंदीत मी जेव्हा आशिषजी झालो होतोे तेव्हा मला मद्रासमध्ये कोणी ओळखत नव्हते.  माझ्यापेक्षा माझ्या मॅनेजरलाच या गोष्टीचे जास्त वाईट वाटायचे.  मला त्यावेळी मग जाने पेहेचाने आणि अंजाने मे बहोत फर्क है, ही गोष्ट समजली. 
 
 
 ज्यावेळी मी साऊथमध्ये काम करीत होतो तेव्हा तिथे आजसारख्या सुख-सुविधा नव्हत्या. व्हनिटी व्हॅन नसायच्या. मग अगदी झाडाखाली सुद्धा आम्हाला कपडे बदलायची वेळ यायची. एवढंच काय तर तिथे उष्णता खुप असायची. काम करताना घामाच्या धारा वाहू लागायच्या. हैद्राबाद  किंवा चेन्नई मध्ये तर शुटिंग करणे मुश्कील व्हायचे. आज जर मुंबईमधील उष्णतेला एखादा अभिनेता घाबरला तर त्याला म्हणावेसे वाटते, बाबा साऊथमध्ये जाऊन शुटिंग करून दाखव. 
 
 मी आजपर्यंत १२ भाषांमध्ये २०० चित्रपट केले आहेत.  चित्रपटसृष्टीकडून मला खुप काही शिकायला मिळाले आहे. चार दिवस मी तेलगु चित्रपटाच्या सेटवर काम केले अन तामिळ चित्रपटाच्या सेटवर गेलो की समजायचे ते कलाकार कसे काम करतात.  सर्व भाषांतील लोकांनी मला आपलेसे केले, प्रेम दिले. 
 
 माझे वडिल मल्याळी, आई बेंगॉली, तिचा जन्म राजस्थानचा, मी दिल्ली मध्ये जन्मलो. त्यामुळे मला जर कोणी विचारले की तु कुठला आहेस, तेव्हा मी समोरच्याला विचारतोे टाईम आहे का तुझ्याकडे ऐकायला. माझ्या घरी सर्व प्रकारचे पदार्थ बनायचे त्यामुळे मोठे होईपर्यंत मला समजायचेच नाही कोणता पदार्थ कोणत्या प्रांताचा आहे. 
 
       मी बेंगलोर मध्ये एका चित्रपटाचे शुटिंग करत होतो. तेव्हा माझ्या सहकलाकाराने मला तिथला फेमस मसाला डोसा खाण्याविषयी विचारले. पण तिथे तू जाऊ नकोस आणि मला पण जाता येणार नाही  मी ड्रायव्हरला घेऊन यायला सांगतो. तेव्हा मी म्हणालो की, खरच मी एवढा मोठा आहे का की माझा ड्राईव्हर गरम डोसा खाईल आणि मी थंड. 
 
   २४ सिरिज अमेझींग प्रोजेक्ट आहे.  हिंमत करुन अशी गोष्ट केली आहे की ती पाहुन तुम्ही म्हणाल वाह... कमाल आहे. कोणीही स्वत:ला कमी समजू नका. कोेणी बिचारा नसतो. जेव्हा एखादा दिग्दर्शक येतो आणि म्हणतो सर छोटी फिल्म है प्लीज काम करो. तर तुम्ही यामुळे स्वत:ला कमजोर बनवता. एवढेच असेल तर नका बनवू सिनेमा. 
 
      काही लोकांमध्ये एक  ठराविक अशी गमतीदार गोष्ट असते.  अशा लोकांचे मला  निरिक्षण करायला आवडते. खर पाहिले तर  प्रत्येक कलाकारच असे निरिक्षण करीत असतो. लोकांच्या चेहºयावरील हावभाव, त्यांच्या मुद्रा टिपायला मला आवडतात. या गोष्टी आपल्या जीवनात कामाला येतात

Web Title: The villain unfolds life's journey
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.