Vikram Gokhleen's exit from the color ... | विक्रम गोखलेंची रंगभुमीवरुन एक्झीट...


          खरा कलाकार हा रंगभुमीवरच घडतो असे म्हणतात. रंगभुमीवर काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावर येणारे अनेक सशक्त कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने रंगभुमीच नाही तर मोठा पडदा गेखील गाजविला आहे. अभिनय क्षेत्रात तर रंगभुमीचे योगदान प्रचंड आहे. असेच रंगभुमीवरील अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी आपल्या विशिष्ठ अभिनय शैलीमुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.  विक्रम गोखले हे त्यातलेच एक कलाकार आहेत. विक्रम गोखले यांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने रंगभुमी गाजविली आहे. अनेक सर्वोत्कृष्ठ नाटके त्यांनी केली आहेत. परंतू आता त्यांनी रंगभुमीवरुन निवृत्ती घेत असल्याचे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. गेल्या दिड महिन्यापासुन घशाचा त्रास होत असल्याने, आवाजावर मर्यादा यायाच्या त्यामुळे रंगभुमीवर संवाद साधणे शक्य होत नव्हते असे त्यांनी सांगितले. रंगभुमीवरुन जरी विक्रन गोखलेंनी निवृत्ती घेतली असली तरी मालिका आणि चित्रपटांमध्ये ते काम करीत राहणार आहोत. 

Web Title: Vikram Gokhleen's exit from the color ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.