Video:रिंकू राजगुरूच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल,मात्र दुस-याच गोष्टींवर होते चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:23 AM2018-07-23T10:23:05+5:302018-07-23T17:27:36+5:30

हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे.

 Video: Rinku Rajguru's dance video is viral, but discussions on other things | Video:रिंकू राजगुरूच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल,मात्र दुस-याच गोष्टींवर होते चर्चा

Video:रिंकू राजगुरूच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल,मात्र दुस-याच गोष्टींवर होते चर्चा

googlenewsNext

"मराठीत सांगितलेलं कळत न्हाय, इंग्लिशममध्ये सांगू" असं म्हणत तमाम सिनेरसिकांना अक्षरशा वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु. सैराट सिनेमातील तिच्या अभिनयाने रसिकांवर जादू केली. सैराटमध्ये परशासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री, तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करुन गेलं. तिच्या अभिनयाचं कौतुक रसिकांसह समीक्षकांनीही केलं. इतकंच नाही तर तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कासुद्धा प्रदान करण्यात आला. पहिल्याच सैराट या सिनेमामुळे रिंकूने तमाम नायिकांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं. सैराटच्या यशामुळे रातोरात स्टार बनलेल्या या अकलुजच्या कन्येकडे विविध ऑफर्स आल्या आहेत.

 

रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेल्या कागर या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीत उत्सुकता आहे. कारण, सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रिंकूच्या दिलखेचक अदा पहायला मिळत आहेत. या व्हिडिओतून बऱ्याच काळानंतर रिंकू प्रेक्षकांसमोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. तर उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रिंकूचा नायक कोण आहे, हे अजून गुलदस्त्यातच आहे. रिंकूचा नवा चित्रपट कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले असताना व्हिडीओत पाहायला मिळणारी रिंकु मध्ये कमालीचा बदल जाणवत आहे. यात तिने वजन घटवले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहाला मिळत आहे. 

कागरच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात रिंकू एका उडत्या चालीच्या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे. तसंच 'लवकरच येतोय कागर' असं सांगायलाही ती विसरत नाही. या गाण्याच्या चालीवरून चित्रपट कसा असेल याचा एक अंदाजही बांधता येईल. मात्र, रिंकूच्या या दिलखेचक अदा प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालतील यात काहीच शंका नाही. रिंकूचा हा कमबॅक चित्रपट असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्याच अकलूजमध्ये करण्यात आले होते.
 

Web Title:  Video: Rinku Rajguru's dance video is viral, but discussions on other things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.