Video: New Challenge for Environmental Promotion on Social Media Challenge given by Sushant Tilak to Siddhartha Chandekar | Video: सुयश टिळकने सिद्धार्थ चांदेकरला दिले हे चॅलेंज, सोशल मीडियावर पर्यावरण संवर्धनासाठीची नवी मोहीम ट्रेंडिंग

देशभर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंज देण्याची स्पर्धा लागली आहे. फिटनेस चॅलेंजच्या माध्यमातून एकमेंकांना टॅग करुन आव्हान करण्याची चढाओढ लागलीय. कुणी सेलिब्रिटींना तर सेलिब्रिटी थेट पंतप्रधान आणि नेत्यांना फिटनेस चॅलेंज देत आहेत. आता अशीच एक नवी चॅलेंज मोहिम सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. मराठी टीव्ही अभिनेता सुयश टिळक सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो. सध्या सगळीकडेच निसर्ग वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आल्यात. सुयश टिळकनेही प्लास्टिक बंदीला समर्थन दिले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या माध्यमातून त्याने फॅन्स आणि नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. शिवाय प्लास्टिकपासून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल हेसुद्धा सुयशने सांगितले आहे. प्लास्टिकऐवजी सिरॅमिकचा वापर करण्याचे आवाहन त्याने व्हिडिओतून केले आहे. दररोजच्या जीवनात पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळा असं कळकळीचं आवाहनही त्याने या माध्यातून केले आहे. हे चॅलेंज त्याने पुढे आपला मित अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला दिले आहे. का रे दुरावा या मालिकेतून सुयश घराघरात पोहचला. त्याने साकारलेला जय रसिकांना भावला होता. सध्या तो 'बापमाणूस' या मालिकेत काम करत आहे. त्याची सूर्या ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
 

सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. सुयशनेही अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आणि त्याला छानशी कॅप्शनही दिली. या फोटोमध्ये सुयश आणि अक्षयाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.लव्ह यू टू द मून अँड बॅक... हॅव अ हॅपिएस्ट बर्थडे... यावर साऱ्यांनीच आनंद व्यक्त करत अनेक नेटीझन्स लाईक्स आणि कमेंटस देताना दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळाले.
 
Web Title: Video: New Challenge for Environmental Promotion on Social Media Challenge given by Sushant Tilak to Siddhartha Chandekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.