Video:अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच, तर सोशल मीडियावर मिळतायेत अशा कमेंटस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:16 PM2018-10-06T12:16:50+5:302018-10-06T12:18:13+5:30

'माझा अगडबम' सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये नाजुकाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या तृप्ती भोईरचा अंदाज प्रेक्षकांचा उर दडपून टाकतो. शिवाय, रायबाच्या भूमिकेत असलेल्या सुबोध भावेसोबतचा तिचा रोमान्सदेखील प्रेक्षकांचे तुफान  मनोरंजन करत आहे.

 Video: Agadbam launches Nazuka's thrilling trailer Out, comments on social media. | Video:अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच, तर सोशल मीडियावर मिळतायेत अशा कमेंटस

Video:अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच, तर सोशल मीडियावर मिळतायेत अशा कमेंटस

googlenewsNext

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अशा या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता.   

आता 'अगडबम नाजुका'च्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर नवीन ट्रेलर लाँच करण्यात आला. सुपरहिट 'अगडबम'चा दमदार सिक्वेल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. साधी सरळ आणि सोज्वळ अशा सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, खराखुरा सुमो आणि डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरदेखील यात आपल्याला दिसून येत असून, मावळ्यासारखा पेहराव घातलेला एक नकापधारी पेहलवानदेखील यात आपल्याला पाहायला मिळतो. अगडबम नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेल्या या पेहलवानाची उकल मात्र या ट्रेलरमध्ये होत नसल्याकारणामुळे, प्रेक्षकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. 

'माझा अगडबम' सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये नाजुकाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या तृप्ती भोईरचा अंदाज प्रेक्षकांचा उर दडपून टाकतो. शिवाय, रायबाच्या भूमिकेत असलेल्या सुबोध भावेसोबतचा तिचा रोमान्सदेखील प्रेक्षकांचे तुफान  मनोरंजन करत आहे. तृप्तीने या सिनेमात अभिनयाबरोबरच लेखक आणि सिनेदिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. शिवाय, निर्मात्यांच्या फळीत  टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईरचा समावेश आहे. तसेच रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.         

Web Title:  Video: Agadbam launches Nazuka's thrilling trailer Out, comments on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.