वरद चव्हाण अडकला लग्नबंधनात, पाहा त्याच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:47 PM2018-12-18T12:47:00+5:302018-12-18T12:48:33+5:30

वरदचे लग्न प्रज्ञा गुरवशी झाले असून प्रज्ञाचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नाही. ती कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असून त्या दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले.

Varad Chavan Adkal in the wedding, see his wedding photos | वरद चव्हाण अडकला लग्नबंधनात, पाहा त्याच्या लग्नाचे फोटो

वरद चव्हाण अडकला लग्नबंधनात, पाहा त्याच्या लग्नाचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देवरदच्या लग्नाला निर्मिती सावंत, त्यांचा मुलगा अभिनय सावंत, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, उषा नाडकर्णी, भरत जाधव, आशालता वाबगांवकर, अलका कुबल, सुचित्रा बांदेकर, किशोरी शहाणे यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीताल अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण सध्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. वरदचे नुकतेच लग्न झाले. आपल्या मुलाचे लग्न पाहाण्याची विजय चव्हाण यांची शेवटची इच्छा अपुरी राहिली. विजय चव्हाण यांची प्रकृती गेल्या कित्येक दिवसांपासून ढासळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही याची जाणीव त्यांना काही दिवसांपूर्वीच झाली होती. आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून देखील दाखवली होती.

वरदचे लग्न प्रज्ञा गुरवशी झाले असून प्रज्ञाचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नाही. ती कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असून त्या दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांच्या लग्नाला निर्मिती सावंत, त्यांचा मुलगा अभिनय सावंत, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, उषा नाडकर्णी, भरत जाधव, आशालता वाबगांवकर, अलका कुबल, सुचित्रा बांदेकर, किशोरी शहाणे यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीताल अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

विजय चव्हाण आणि त्यांचा मुलगा वरद चव्हाण या दोघांचाही वाढदिवस 8 फेब्रुवारीलाच असतो. वरदने ऑन ड्युटी 24 तास, धनगरवाडा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ललित २०५ या मालिकेत काम करत आहे.

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने काही महिन्यांपूर्वी निधन झाले. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट, नाटकातील त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून विजय चव्हाण आजारी होते. विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.

Web Title: Varad Chavan Adkal in the wedding, see his wedding photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.