म्हणून वैदही परशुरामीने शेअर केला 10 वर्षांपूर्वीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 06:30 AM2019-05-22T06:30:00+5:302019-05-22T06:30:00+5:30

अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.

Vaidehi parshurami completed her 10 years in marathi film industry | म्हणून वैदही परशुरामीने शेअर केला 10 वर्षांपूर्वीचा फोटो

म्हणून वैदही परशुरामीने शेअर केला 10 वर्षांपूर्वीचा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्दे'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने 10 वर्षापूर्वी मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती.

अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. वैदहीला इंडिस्ट्रीत येऊन 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झालायं. 'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने 10 वर्षापूर्वी मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले. याचं संदर्भातील पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिने म्हटलंय,''मला कधीच वाटले नव्हते मी इथं पर्यंत येऊन पोहोचेन, मी २० वर्षांपूर्वी नाचायला सुरवात केली आणि मला माहित मला कधीच थांबायचे नाही आहे. त्याच्या प्रमाणे मी सिनेमांमध्ये काम करायची सुरुवात केली. मला इथंही कधी थांबायचे नाहीय. एक माझ्यासाठी हवा बनलंय तर दुसरं पाणी.'' 

तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.  रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.  

Web Title: Vaidehi parshurami completed her 10 years in marathi film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.