Urmila Kothare and her daughter Jija are self-reliant on social media viral | उर्मिला कोठारे आणि तिची मुलगी जिजाचा हा सेल्फी होतोय सोशल मीडियावर व्हायरल

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे. तिच्या स्वागताची त्यांनी जोरदार तयारी केली होती. आदिनाथ आणि उर्मिला यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव ठेवले असून तिचे नाव जिजा आहे. आदिनाथने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिचे नाव सगळ्यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर या गोंडस जिजाचे फोटो देखील आदिनाथने सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्मिला आणि आदिनाथ त्यांच्या सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांच्या या लाडक्या चिमुकलीचे फोटो पोस्ट करत असतात आसनी त्यांचे चाहते देखील या फोटोंना भरभरून लाईक्स देतात. काही दिवसांपूर्वी तर उर्मिलाने जिजाचा स्वीमिंग करतानाचा व्हिडिओ तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि आता त्याच्यानंतर जिजा आणि उर्मिलाचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उर्मिलाने नुकताच जिजा सोबत एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत त्या दोघीही खूपच छान दिसत आहेत. या फोटोसोबत उर्मिलाने एक छानसे कॅपशन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, आम्हाला आतापासूनच सेल्फी काढायला आवडायला लागले आहे. माझ्या बेबीची सगळ्यात पहिली ट्रिप... आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो आहोत. आमच्या चिमुकलीवर देवीचा आशीर्वाद नेहमीच राहू दे...
उर्मिला आणि जिजाच्या या फोटोला आतापर्यंत 66 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी त्यांना हा फोटो खूप आवडला असल्याचे प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगितले आहे.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. 

Also Read : आदिनाथ कोठारे करणार माधुरी दीक्षितसोबत काम
Web Title: Urmila Kothare and her daughter Jija are self-reliant on social media viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.