Under the teaser poster of the movie, the correct meaning of 'redu' is understood | सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ

'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय? रेड्याला रेडू म्हंटले असेल का... किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. 'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरुवात केली आहे. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठ्येने रेडूचा 'रेडू स्टेडू गो' असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील 'रेडू' एक प्राण्याचे नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला रेडा म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर अमेय वाघने थेट 'रेडीमेड' आणि 'ड्युप्लेक्स'ला एकत्र करत 'रेडू' असा निष्कर्ष काढला. खरं तर यांपैकी कोणालाच 'रेडू'चा नेमका अर्थ सांगता आला नाही. 'रेडू' नावाविषयी कलाकारांनी केलेल्या या भन्नाट तर्कवितर्कानंतर, अखेरीस 'रेडू' चा खरा अर्थ या सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे स्पष्ट करण्यात आला. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच  प्रदर्शित  करण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरमध्ये रेडियो दिसत असल्यामुळे, 'रेडू' म्हणजेच 'रेडियो' हे लोकांना समजले आहे.'रेडू' या सिनेमातील टीझर पोस्टरवर रेडियोचा चेहरा असलेला एक माणूस चालताना दिसून येतो. जुन्या काळातला आकाशवाणी संच यात पाहायला मिळत असल्यामुळे, एका रेडियोची गमतीदार गोष्ट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हा टीझर पोस्टर पाहताना येतो. शिवाय यात मालवणी भाषादेखील आपल्याला ऐकू येत असल्यामुळे, रेडीयोच्या माध्यमातून मालवणी मनोरंजाचा तडकादेखील यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवल सारडा यांच्या सौजन्याने ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रेडीयोच्या अमाप प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या या विनोदी सिनेमात शशांक शेंडे मध्यवर्ती भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार असून, छाया कदमचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे. सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित या सिनेमाचे लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.मालवणी भाषेचा साज ल्यालेल्या, या सिनेमाचे चित्रीकरण कोकणात झाले असल्यामुळे, नोकरदारवर्गासाठी यंदाची उन्हाळी सुट्टी मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आली आहे.कारण फणस,जांभूळ आणि हापूस आंब्याची लज्जत चाखण्याबरोबरच, कोकणी संस्कृतीच्या खुमासदार विनोदाची मेजवानीदेखील 'रेडू'च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 


Web Title: Under the teaser poster of the movie, the correct meaning of 'redu' is understood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.