Umesh - A song featuring Tejashri Chemistry - Valentine's Day celebrations | व्हेलेंटाईन डे निमित्ताने उमेश - तेजश्रीची केमिस्ट्री दाखवणारे गाणे लाँच

'प्रेम' ही कधीच न बदलणारी संकल्पना असून,ती नेहमीच एका नव्या रुपात आपल्यासमोर येत असते.प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणा-या प्रेमियुगुलांसाठी तर प्रेमाचा प्रत्येकदिवस नव्याने प्रेमात पडणारा असतो. अशा या प्रेमयुगुलांसाठी खास व्हेलेंटाईन डे निमित्ताने 'भेटते ती अशी' हे रोमँटिक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या आगामी सिनेमातील हे गाणे असून, सिटीलाईट माहिम येथे खास गुलाबी वातावरणात या गाण्याचे दिमाखदार लाँँचिंग करण्यात आले.लाल रंगाची फुले,केक आणि फुगे अशा रोमेंटिक अंदाजात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला.येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील 'भेटते ती अशी' हे गाणे मराठीचा हँडसम हंक उमेश कामतवर चित्रित करण्यात आले आहे. उमेश - तेजश्रीची केमिस्ट्री मांडणारे हे गाणे,वैभव जोशीने शब्दबद्ध केले आहे.तसेच अवधूत गुप्तेने स्वतः हे गीत गायले असून याचे संगीत दिग्दर्शनदेखील केले आहे.तसेच दिपाली विचारेने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.आपल्या प्रिय व्यक्तीच्या भेटीची आठवण सांगणारे हे गाणे प्रेमियुगुलांसाठी एक पर्वणीच ठरत आहे.प्रेमाची नवी परिभाषा मांडणा-या या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते असून त्यांचे मित्र रविंद्र शिंगणे यांचे बहुमूल्य सहकार्य यात लाभले आहे.

Also Read: आगामी 'असेही एकदा व्हावे'या ही जोडी चित्रपटातून प्रथमच एकत्र


छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेने रसिकांच्या मनावर जादू केली. या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला असला तरी तेजश्रीने साकारलेली जान्हवी आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ती खूप खूश असल्याचे तिच्या फॅन्सना सांगितले आहे.तेजश्री प्रधानने नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच खूश असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेकवेळा आपण आपल्या आयुष्यात प्रगती करत असल्याने खूप खूश असतो आणि ज्यावेळी आपण लीजेंडना भेटतो, तेव्हा काय बोलायचे हे आपल्याला कळत नाही. मी खूपच खूश आहे.बबलू बॅचलर या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव भट्टाचार्य करत आहेत. या चित्रपटात तेजश्रीची जोडी शर्मन जोशीसोबत जमणार आहे. तेजश्रीने याआधी देखील शर्मन सोबत काम केले आहे. मैं और तुम या नाटकात या दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 

Web Title: Umesh - A song featuring Tejashri Chemistry - Valentine's Day celebrations
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.