Umesh Kamat is telling that Priya Bapat had given his birthday to her birthday | ​उमेश कामत सांगतोय प्रिया बापटने त्याच्या वाढदिवसाला दिले होते हे सरप्राईज

उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. प्रिया आणि उमेश यांचा प्रेमविवाह असून त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना खूपच आवडते. उमेश आणि प्रिया या दोघांमध्ये उमेशला मासे खूप आवडतात तर प्रियाने कधी माश्यांना स्पर्श देखील केलेला नाही. पण उमेशच्या एका वाढदिवसाच्या दिवशी प्रियाने त्याच्यासाठी खास माश्यांचा पदार्थ बनवला होता. प्रियाने त्याच्या वाढदिवसाला दिलेले हे सरप्राईज तो कधीच विसरू शकत नाही. उमेश सांगतो, प्रियाला मासे किंवा मांसाहारी पदार्थांचा इतका तिटकारा आहे की, कधी ती या पदार्थांच्या जवळपास देखील फिरकत नाही. पण प्रियाने एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला सरप्राइज देण्यासाठी एक फिशचा पदार्थ बनवला होता. यासाठी तिने आमच्या एका मित्राची मदत घेतली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण फिश बनवताना तिने हाताला चक्क ग्लोव्हज घातले होते. पण प्रियाने माझ्यासाठी घेतलेल्या या मेहनतीमुळे माझा तो वाढदिवस माझ्यासाठी खास ठरला. 
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा वयाने कितीतरी वर्षं लहान असणाऱ्या व्यक्तीशी सेलिब्रिटींनी लग्न केल्याची विविध उदाहरणं आपल्याला चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. अशाच सेलिब्रिटींपैकी मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट लव्हेबल आणि क्यूट कपल म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया आणि उमेश गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करतायत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाची कबुली पहिली कोण देणार यामुळे त्यांची काहीशी अडचण झाली होती. अखेर प्रियाने आपले उमेशवर असलेले प्रेम व्यक्त केले. मात्र उमेश या प्रेमाच्या नात्याला लग्नाच्या रुपात बदलण्याबाबत साशंक होता. याला कारण म्हणजे उमेश आणि प्रिया यांच्यातील वयाचे अंतर. दोघांच्या वयात आठ वर्षांचे अंतर आहे. उमेश प्रियापेक्षा आठ वर्षांने मोठा आहे. त्यामुळे लग्नाबाबत होकार द्यायला त्याने एक दोन नाही तर तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतला. खुद्द प्रियानेच याबाबतची माहिती एका मुलाखतीत दिली होती. 

Also Read : उमेश कामतला नव्हे तर या गोष्टीला प्रिया बापट करतेय मिस
Web Title: Umesh Kamat is telling that Priya Bapat had given his birthday to her birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.