Umesh Jagtap and Mitali Jagtap together for the first time together | ​घाटच्या निमित्ताने उमेश जगताप आणि मिताली जगताप पहिल्यांदाच एकत्र

अभिनेता उमेश जगताप आणि अभिनेत्री मिताली जगताप यांनी रंगभूमी, मालिका, रुपेरी पडदा अशा विविध माध्यमातून सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सर्वच माध्यमांवर अधिराज्य गाजवणारे असे कलाकार जेव्हा प्रथमच एकत्र येतात. तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. आतापर्यंत मोजक्या पण हटके भूमिका करणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार  आगामी घाट या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र झळकणार आहेत. जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेला घाट हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन जरे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राज गोरडे यांनी केले आहे.
उमेश यांनी यात ‘जग्गू’ तर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मितालीने विमल ही व्यक्तीरेखा साकरली आहे. घाटमध्ये प्रेक्षकांना उमेशचे अत्यंत वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. याबाबत उमेश सांगतात की, या चित्रपटातील माझी भूमिका काहीशी निगेटिव्ह आहे. घाटावर वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबातील बेफिकीर बापाची भूमिका मी साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मितालीसारख्या प्रतिभावान अभिनेत्रीसोबत प्रथमच काम करण्याची संधी लाभली. सोशिक बायको, मुलाच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी धडपडणारी आई यात मितालीने साकरली असून या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. जे माझ्यातील कलाकार घडवण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण असल्याचे अभिनेत्री मिताली जगताप यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव चित्रपटाच्या चौकटीमध्ये मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राज गोरडे यांनी केला आहे. घाटच्या निमित्ताने प्रेक्षकांना वास्तववादी कथानक आणि लोकेशन्सचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.  चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राज गोरडे यांनी लिहिले असून उमेश आणि मिताली सोबतच यश कुलकर्णी आणि दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांच्या तसेच रिया गवळी यांच्याही घाट मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. १५ डिसेंबरला घाट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : आईने केलेल्या विनवणींमुळे या कलाकाराला मिळाली घाट या चित्रपटात काम करण्याची संधी
Web Title: Umesh Jagtap and Mitali Jagtap together for the first time together
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.