The trailer launch of 'The Silence', will be released on October 6 throughout Maharashtra | 'द सायलेन्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँच,येत्या 6 ऑक्टोबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

इफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ एक वास्तवदर्शी चित्रपट. चित्रपट महोत्सवांत “जबरदस्त”, “दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट”, “हा चित्रपट पाहताना उर भरून आला होता” अशा अनेक भावूक प्रतिक्रिया मिळवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहोळ्याद्वारे लाँच करण्यात आला. प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, तर सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी ख्नन्नाबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. तर छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे.हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

द सायलेन्स या चित्रपटात रघुवीर यादव, अंजली पाटील, सैराट फेम नागराज मंजुळे, कादंबरी कदम या अनुभवी कलाकारांच्या जोडीने मुग्धा चाफेकर आणि वेदश्री महाजन या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.‘द सायलेन्स’ हा चित्रपट  महाराष्ट्र राज्य पुरस्कार गाजवून आता कांस चित्रपट महोत्सवात पोहोचला आहे. प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाने जगातील ब-याच नामांकित समजल्या जाणा-या चित्रपट महोत्सवांमध्ये आपले नाव कोरले आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा ह्या वर्षीच्या सगळ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाला पात्र ठरत आहे.

Web Title: The trailer launch of 'The Silence', will be released on October 6 throughout Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.