This time, the villager will not celebrate Raksha Bandhan with the Mahajan's sister, but sister says, 'I do not have any problem!' | यंदा गश्मीर महाजनी बहिणीसोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करणार नाही, तरीही बहिण म्हणतेय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही!’

रक्षाबंधन हा सण भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याचं प्रतीक... मात्र अभिनेता गश्मीर महाजनी यंदा त्याच्या बहिणीला भेटू शकणार नाहीय.त्याला तसे खास कारणही आहे. तो सध्या कामात खूप बिझी आहे. त्याच्या सिनेमा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. त्यामूळे तो वेगवेगळ्या शहरात जाऊन सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. म्हणूनच यंदा रक्षाबंधनाला तो त्याच्या मोठ्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करू शकणार नाही.गश्मीरला त्याच्या मोठ्या बहिणीविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “माझी ताई माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठी आहे.त्यामूळे ती माझी दूसरी आई आहे, असं म्हटलं तरी चालेल.लहानपणापासून तिने मला सांभळलंय.माझं प्रत्येक गुपित ताईला माहित आहे.माझी ताई माझ्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.“ माझी मोठी बहिण रश्मी महाजनी-वैद्य तिच्या लग्नानंतर बेळगावला राहते. त्यामूळे माझं फिल्मी करीयर चालू झाल्यापासून दरवर्षी आम्हांला एकत्र रक्षाबंधन साजरं करता येतंच, असं नाही. पण मी जगात कुठेही असलो, तरीही मला माझ्या पत्त्यावर एक दिवस आधीच राखी पोहोचते. एका वर्षी मी मध्यप्रदेशात शूटिंग करत होतो.शूटिंग मध्यप्रदेशातल्या खूपच आतल्या भागात होतं.तो पत्ता शोधणं कठीण असतानाही तिची राखी एक दिवस आधी पोहोचली. यंदाही हा नियम चुकणार नाही, याची मला खात्री आहे.” गश्मीरकडे राखी पोहोचल्यावर ती रक्षाबंधनाच्या दिवशी हाताला बांधून त्याचा फोटो बहिणीला पाठवणं हे बंधनकारक असतं. त्यामूळे यंदाही गश्मीर रक्षाबंधनाला हाताला राखी बांधून ताईला सेल्फी पाठवत रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे.  
Web Title: This time, the villager will not celebrate Raksha Bandhan with the Mahajan's sister, but sister says, 'I do not have any problem!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.