That's why Avadhut's dream is complete | असे झाले अवधुतचे स्वप्न पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे देशासहित परदेशातदेखील तमाम चाहते आहेत. सचिनची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. सचिनला भेटणे हे सगळ्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरले आहे ते संगीतकार अवधुत गुप्तेचे. नुकताच अवधुतने सचिनसोबतचा फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोच्याखाली अवधुतने भूतलावर साक्षात देव अवतरला असे लिहिले आहे. अवधूतच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरुन लाईक्स येता आहेत. या फोटोला अभिनेता सुयश टिळकनेदेखील कमेंट केली आहे. तर अवधुतच्या एका चाहत्याने तर अनमोल फोटो अशी कमेंट दिली आहे. 

 

Web Title: That's why Avadhut's dream is complete
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.