Tejaswini Pundit is happy because of this reason ... | ​तेजस्विनी पंडित या कारणामुळे आहे खुश...

मी सिंधू ताई सपकाळ, तू ही रे असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या चांगलीच खूश आहे. २०१८ हे वर्षं तिच्यासाठी खूपच चांगले असल्याचे तिचे म्हणणे आहे. हे वर्षं सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने मराठी चित्रपटसृष्टीला दोन हिट चित्रपट दिले आहेत. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनी चा 'देवा' हा चित्रपट प्रदर्शित झाला तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद दिल्यामुळे तेजस्विनीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
देवा या चित्रपटामध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरी सोबत काम केले. चित्रपटातील तिच्या अभिनयासोबतच तिच्या अनोख्या फॅशनची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटामध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली. सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत यांच्यासोबत तेजस्विनीच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले. 'देवा' आणि 'ये रे ये रे पैसा' असे दोन सुपरहिट चित्रपट काहीच दिवसांच्या अंतरावर दिल्यामुळे तेजस्विनी सध्या चांगलीच खूश आहे. याविषयी ती सांगते, "दोन्ही चित्रपट माझ्यासाठी महत्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण करताना मला तितकीच मजा आली. देवा २२ डिसेंबरला तर येरे येरे पैसा ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये काहीच दिवसांचे अंतर असल्याने माझी धावपळ होत होती. पण दोन्ही चित्रपटांची टीम खूपच चांगली असल्याने मला प्रमोशनमध्ये ताळमेळ बसवता आला. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपत चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. पण मला माझ्या सगळ्याच चित्रपटांकडून अपेक्षा असतात. 

Also Read : तुम्हाला माहितीये का, तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर यांनी बिग बीं सोबत केले आहे काम!
Web Title: Tejaswini Pundit is happy because of this reason ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.