Tejaswini Pandit Made Bal Ganesha Painting | तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आला ‘फिल्ममेकर बालगणेशा' !
तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आला ‘फिल्ममेकर बालगणेशा' !

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. त्याचप्रकारे तेजस्विनी पंडीतलाही अभिनया व्यतिरिक्त तेजस्विनीला पेेंटींगचीही आवड आहे. उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय एक उत्तम  डिझाइनरही आहे. तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आलेले एक बालगणेशाचे चित्र सध्या गणेशोत्सवामध्ये सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. ह्या बालगणेशाच्या हावभावातून तो फिल्ममेकर गणेशा असल्याचं प्रचिती येते. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रकलेचे कुठलेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण न घेताही ती एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टसारखी चांगली चित्र रेखाटते. आता यापुढेही तेजस्विनीच्या चाहत्यांना नक्कीच तेजस्विनीच्या अशा एकाहून एक उत्तमोत्तम चित्र पाहण्याची इच्छा असणार हे मात्र नक्की.

 

तेजस्विनी पंडितने 'मी सिंधुताई सपकाळ', 'तू ही रे' असे सिनेमा, विविध नाटकं आणि '१०० डेज' सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. 

२०१८ हे वर्ष तेजस्विनीसाठी चांगलं ठरलं आहे.२०१७ च्या अखेरीस तेजस्विनीचा देवा तर २०१८ च्या सुरुवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ हा सिनेमा रिलीज झाला. मुख्य म्हणजे या दोन्ही सिनेमांनी थिएटर हाऊसफुल्ल केलं. रसिकांनी या दोन्ही सिनेमांना छान प्रतिसाद दिला.


Web Title:  Tejaswini Pandit Made Bal Ganesha Painting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.