‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:01 PM2018-08-21T12:01:21+5:302018-08-22T06:00:00+5:30

या सिनेमात पर्ण पेठे हिची  महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'Tech Care Good Night' is the story of today's generation - Paran Pethe | ‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे

‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘टेक केअर गुड नाईट’ हे एका कुटुंबाची गोष्ट आहे ‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

वाय झेड, फास्टर फेणे, फोटोकॉपी या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला  नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात पर्ण पेठे हिची  महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. 

ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा  प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृति करण्याचे काम करेल असे पर्ण पेठे म्हणाली. ‘टेक केअर गुड नाईट’ हे एका कुटुंबाची गोष्ट आहे. आईबाबा आणि दोन मुले असे हे एक गोड कुटुंब आहे. शाळेमध्ये काही मुले खूप हुशार असतात तर काही मुले खूप दंगेखोर असतात अशा मुलांकडे सगळ्यांचे लक्ष असते पण अशी काही मुले पण असतात ती खूप हुशार नसतात व ती दंगे पण करत नाहीत अशा मुलांचे ही मुलगी प्रतिनिधित्व करत असते. तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. म्हणूनच ती मोबाईल किंवा इंटरनेट यांचा आधार घेत असते. एक दिवस चटिंग करताना अचानक काय कॉम्पलीटीसी तयार होते. मग तो प्रॉब्लेम सोडवताना कुटुंबाला काय अडचणी येतात याची ही गोष्ट आहे.    

पाहिल्यापासूनच मी इरावती हर्षे यांची चाहती होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळणे मी भाग्यच समजते. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर हे देखील दिग्गज कलाकार आहेत सेटवर त्यांच्याकडून , आदिनाथ कोठारे आणि लेखक  आणि दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांच्या कडून अनेक गोष्टी शिकता आल्या.   

सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी सिनेमा आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात.  त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगण गरजेच आहे. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ‘टेक केअर गुड नाईट’  हा सिनेमा मनोरंजनासोबत तुमचे डोळे उघडण्याचे काम करेल असे पर्ण पेठे म्हणाली.


 

Web Title: 'Tech Care Good Night' is the story of today's generation - Paran Pethe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.