Swapnil Joshi and Mukta Barve's third part of Mumbai-Pune-Mumbai film soon | स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानंतर स्वप्निल आणि मुक्ता यांची जोडी आपल्याला अनेक चित्रपट, मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या यशामुळे मुंबई-पुणे-मुंबई 2 हा या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातही प्रेक्षकांना स्वप्निल आणि मुक्ताची जोडी पाहायला मिळाली होती. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आणि आता मुंबई-पुणे-मुंबई 3 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मुंबई-पुणे-मुंबई 3 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू झाले असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.  
एखादा चित्रपट हिट झाला की त्याचा सिक्वल बनवण्याचे फॅड आजवर आपल्याला हॉलिवूड आणि बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले होते. आता मराठीतदेखील तोच ट्रेंड यायला लागला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आपल्याला हा ट्रेंड मुंबई-पुणे-मुंबईच्या निमित्ताने आता पाहायला मिळत आहे. 
मुंबई-पुणे-मुंबई 2 या चित्रपटानंतर अनेकांनी या चित्रपटाचा पुढचा भाग पाहाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच तिसऱ्या भागाची जुळवाजुळव करण्याची या चित्रपटाच्या टीमने सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातदेखील स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांचीच जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच चित्रपटातील टीमदेखील तीच राहाणार असल्याचे म्हटले जात आहे. 
मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या दोन्ह भागातील गाणीदेखील प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता या चित्रपटाचा तिसरा भागही संगीतमय असणार असे म्हणायला काहीच हरकत नाही. 
Web Title: Swapnil Joshi and Mukta Barve's third part of Mumbai-Pune-Mumbai film soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.