Swanandi Instagram account | स्वानंदीचे इन्स्टाग्राम अकाऊंट

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री मिनल म्हणजेच स्वानंदी टिकेकर हिने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले आहे. मोस्टली सगळे सेलेब्रिटी सोशलमिडीयावर अकाऊंट सुरू करत असतात. पण स्वानंदी हिने स्पेशल अकाऊंट सुरू केल्याचे टिवीटर अकाऊंटवर सांगितले आहे. कारण सध्या अनेक कलाकारांच्या नावाने सोशल मीडियावर बरेच खोटे अकाउंट्सही सुरु असल्यामुळे स्वानंदीने तिच्या पोस्टमध्ये हे तिचे स्वत:चे खरे अकाउंट आहे हे न चुकता तिने लिहीले  आहे. स्वानंदीने तिच्या या आॅफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पहिलावहिला फोटो पोस्ट करत इन्स्टाग्राममध्ये पदार्पण केले आहे. थेट सिंगापूरहून तिने केलेली ही पोस्ट केली आहे.