Surprised by Siddharth | सिध्दार्थने दिले सरप्राईज

 अभिनेता सिध्दार्थ मेनन याने नुकताच आपल्या पत्नीचा वाढदिवस हटक्या स्टाइलने साजरा केला आहे. काही महिन्यांपूर्वीच सिध्दार्थचे लग्न झाले आहे. त्यामुळे साहजिकच लग्नानंतरच्या पत्नीच्या पहिला वाढदिवसाला त्याने थेट दुबईच गाठली. सिध्दार्थची पत्नी ही कामानिमित्त दुबईला असते. वाढदिवसा दिवशी सिध्दार्थचे हे सरप्राईज पाहून तिच्या डोळयात अश्रूच आले. सिध्दार्थने हा सरप्राईज व्हिडीओ सोशलमिडीयावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये सिध्दार्थ चक्क तिच्या आॅफीसमध्येच पोहोचला. त्याची पत्नीदेखील सिध्दार्थला पाहून आश्चर्य झाली. यावेळी सिध्दार्थने तिला एक सुंदर गुलाबाच्या फुलांचा गुच्छा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तुझ्या जीवनातील सगळया इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. मी सदैव तुझ्यासोबतच आहे. आय लव्ह यू म्हणत त्याने सोशलमिडीयावरदेखील तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. Web Title: Surprised by Siddharth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.